corona virus -पोलीस, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:29 IST2020-03-24T12:28:09+5:302020-03-24T12:29:42+5:30
जगात थैमान घालत असलेल्या कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व प्रशासनात काम करत असलेल्या लोकांच्या आरोग्यचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनमार्फत प्रशासनातील लोकांना मास्कवाटप करण्यात आले.

corona virus -पोलीस, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप
सांगली : जगात थैमान घालत असलेल्या कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व प्रशासनात काम करत असलेल्या लोकांच्या आरोग्यचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनमार्फत प्रशासनातील लोकांना मास्कवाटप करण्यात आले.
कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्यावतीने सांगली येथील विविध रिक्षा थांबे, संजय नगर पोलिस स्टेशन मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मास्क वाटप करण्यात आले. शहरात संचारबंदीच्या कामात व्यस्त असलेले वाहतूक पोलिस, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मास्कवाटप करण्यात आले.
फाऊंडेशनच्यावतीने नागरिकांना कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक गोष्टींचे प्रबोधन करणाऱ्या पत्रकाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनचे इरफान मुल्ला, शिवराज कदम, सद्दाम कलावंत, सुनील ओलेकर, विजय पवार, प्रकाश मालदार, इम्रान मुल्ला, वसीम इनामदार, साकीब मकानदार, आयुब पटेल, बिपिन कदम, रवींद्र खराडे, आयुब पटेल, सनी धोतरे, अयुब निशाणदार, आशिष चौधरी, सतीश गोरे आदी सहभागी झाले होते. वेगवेगळ््या टिम करून फाऊंडेशनने हा उपक्रम राबविला.