शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

corona virus -‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे काव्यमय आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 1:07 PM

वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे सांगलीतील इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी अनोखे आवाहन केले आहे. त्यांची कविता सोशल मिडियावरून व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे काव्यमय आवाहन कविता सोशल मिडियावरून व्हायरल

सांगली : वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे सांगलीतील इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी अनोखे आवाहन केले आहे. त्यांची कविता सोशल मिडियावरून व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीस उतरली आहे.कवितेत त्यांनी लोकांना सतर्कतेचे आवाहन करतानाच आधुनिक युगात हरवलेली माणुसकी, आरोग्याबाबतचा गाफिलपणा, अस्वच्छता, बेशिस्तपणा, हरवलेले स्वत्व या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकला आहे. साहित्य, सामाजिक चळवळीत सातत्याने ते सहभागी असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या या अनोख्या काव्यत्मक आवाहनास पसंती मिळत आहे.माणसांनो, बदला आता !माणसांनो बदला आता, बदल अटळ आहेअन्यथा सर्वांचं मरण अटळ आहे.अन्यथा सर्वांचं सरण अटळ आहे.हवा गढुळली, तशी माणसंही...जमीन भेगाळली, आणि माणसंही ,पाणी आटलं..., माणसांचंही तेच झालं .कितीही खणलं तरी , माणसांना पाझर फुटत नाही .'फवारणी' सुरूच आहे ..फळं अकाली पिकवून, 'माणूस' अकाली गळू लागलाय .हे गळणं अटळ आहे...माणसानो बदला आता, अन्यथा सर्वांचं मरण अटळ आहे.जमिनीत साखर पेरताय, तिथं मीठ उगवतंय .माणसांत साखर पेरताय, तिथं कॅन्सर उगवतोय .माणसांनो, आता 'वेळ' भरत आलीय...काळ बदलतोय,लक्षात ठेवा,माणसाला मीठ फुटलं तरी चालेल ,पण जमिनीला कॅन्सर होता कामा नये...जमीन मरता कामा नये. तिचं जगणं अटळ आहे .माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे ,अन्यथा मरण अटळ आहे.फेसबुक, वॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम...जळमट जायला हवं .इमोजीचं स्माईल ओरिजिनल चेहऱ्यावर यायला हवं .'हळवं मन' आता डिलिट व्हायला लागलंय...त्याला पुन्हा माणसांत आणायला हवं .मोबाईलवरची बोटं पुन्हा मातीत आली,तरच जगणं सुखद आहे. माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे,अन्यथा मरण अटळ आहे.माणसाचं खूप झालं, आता प्राण्यांना आरक्षण हवं .वाघ, सिंह, हत्ती, चिमणी, पाखरं ...त्यांना केवळ पोटाला हवं .झाडांच्या पानांतून दिसणारा बिबट्या...केवळ पोटासाठी ....शेताशेतांतून, रानारानांतून आणि हो...हल्ली वर्तमानपत्राच्या पानांपानांतूनही दिसतो .करायचंच असेल तर,माणसातल्या ...मोकाट जनावरांना करा जेरबंद दिसताक्षणी.धरणीवरच्या त्या जिवांचं असणं 'अटळ' आहे .माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे ,अन्यथा मरण अटळ आहे .माणसांनो ... बदलाच आता !असे मारत सुटलात सा?्यांना..झाडांना, वेलींना आणि मुक्या प्राण्यांना...,तर ...शापातून सुटका नाही .एक दिवस...तुमच्यातही रुजणार नाही बीज .उजाड होऊन जाल या मातीसारखे .तडफडून मराल चिमण्या-पाखरांसारखे .किंवा....धावत सुटाल बेभान, जिवाच्या आकांताने,माणसांच्या कळपात सापडलेल्या बिबट्यासारखे ,आणि .......आणि....विषाणूंची अदृश्य फौज जाळी लावून बसली असेल ...तुमच्यासाठी ....एक दिवस.हा शाप अटळ आहे ,माणसांनो बदला आता, बदल अटळ आहे .अन्यथा मरण अटळ आहेअन्यथा सरण अटळ आहे.- डॉ. अनिल मडके

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcultureसांस्कृतिक