corona virus: Corona to two Zilla Parishad officials, four employees; The total number of patients was 37 | corona virus : जिल्हा परिषदेत दोन अधिकारी, चार कर्मचार्‍यांना कोरोना

corona virus : जिल्हा परिषदेत दोन अधिकारी, चार कर्मचार्‍यांना कोरोना

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत दोन अधिकारी, चार कर्मचार्‍यांना कोरोना एकूण रुग्णांची संख्या ३७ झाली

सांगली : जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिरी आणि चार कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा परिषदेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७ झाली आहे.

जिल्हा परिषदेतील जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातील डॉक्टरासह कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांचे 'वर्क फ्रॉम होम' कामकाज सुरु होते.

सोमवार दि. ३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी जि. प. मुख्य वित्त अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिरी आणि चार कर्मचारी यांचे कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: corona virus: Corona to two Zilla Parishad officials, four employees; The total number of patients was 37

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.