corona in sangli : सांगली जिल्ह्यात चारजणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 13:11 IST2020-05-27T13:09:46+5:302020-05-27T13:11:14+5:30

सांगली जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालानुसार चारजणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुलतानगादे (ता.खानापूर), नृसिंहपूर (ता. कवठेमहांकाळ), करूंगली (ता. शिराळा) आणि आंबेगाव (ता. कडेगाव) येथील रूग्णांचा यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९२ वर गेली आहे.

corona in sangli: Four people were infected with corona in Sangli district | corona in sangli : सांगली जिल्ह्यात चारजणांना कोरोनाची लागण

corona in sangli : सांगली जिल्ह्यात चारजणांना कोरोनाची लागण

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात चारजणांना कोरोनाची लागणसुलतानगादे, नृसिंहपूर, करूंगली, आंबेगावच्या रूग्णांचा समावेश

सांगली : जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालानुसार चारजणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुलतानगादे (ता.खानापूर), नृसिंहपूर (ता. कवठेमहांकाळ), करूंगली (ता. शिराळा) आणि आंबेगाव (ता. कडेगाव) येथील रूग्णांचा यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९२ वर गेली आहे.

सुलतानगादे तालुका खानापूर येथील ५७ वर्षीय महिला दिनांक २२ मे रोजी मुंबईहून आल्या होत्या तसेच करूंगली तालुका शिराळा येथील ३३ वर्षीय पुरुष दि. १७ मे रोजी मुंबईहून आला होता, तर आंबेगाव तालुका कडेगाव येथील ३६ वर्षीय पुरुष दि २४ मे रोजी मुंबईहून आला होता या तिघांना कोरोणाची लागण झाली असून त्यांच्यावर मिरज येथे आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.

लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ)येथील आठ वर्षीय मुलगी ही दिनांक २३मे रोजी मुंबईहून आल्याने कम्युनिटी क्वारंटाईण मध्येच होती तिला ही कोरोणाची लागण झाली आहे. या सर्वांवर मिरज सिव्हिल येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.

सुलतानगादे , करंगुली व आंबेगाव येथे कंटेनमेंट झोनची कार्यवाही तसेच अन्य प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

Web Title: corona in sangli: Four people were infected with corona in Sangli district