शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

म्हैसाळच्या शाळेत एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, सर्वांचे घेतले स्वॅब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 1:13 PM

CoronaVirus Mirja Sangli School- म्हैसाळ ता.मिरज येथील एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने म्हैसाळ येथे खळबळ उडाली असून आतापर्यंत ७४ विध्यार्थ्यांचे तर २५ शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले असून आता जवळपास ६० विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. 

ठळक मुद्देम्हैसाळच्या शाळेत एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, सर्वांचे घेतले स्वॅब शाळा १४ दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय

म्हैसाळ : म्हैसाळ ता.मिरज येथील एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने म्हैसाळ येथे खळबळ उडाली असून आतापर्यंत ७४ विध्यार्थ्यांचे तर २५ शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले असून आता जवळपास ६० विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. म्हैसाळ येथील एका महाविद्यालयातील शिक्षक १७ मार्चला कोरोना पाँझिटिव्ह आले.त्यानंतर लगेचच शालेय प्रशासनाच्या वतीने सल्लागार समितीची व शालेय शिक्षकाची बैठक घेऊन शाळा १४ दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर शालेय शिक्षकांनी यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र म्हैसाळ, जिल्हापरिषद व शाळेच्या संस्थेला दिली. संपर्कात आलेल्या जवळपास ७४  विध्यार्थ्यांचे तर २५ शिक्षकांचे प्राथमिक आरोग्य केद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वॅब घेतले असून आता ६० विध्यार्थ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे.

शिक्षक कोरोना चाचणी पाँझिटिव्ह आल्यानंतर काल आम्ही विध्यार्थ्यांचे व शिक्षकांचे असे एकूण ९८ जणाचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी लँबला पाठविले आहेत.आज ६० जणाचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.-विजय पाटीलवैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हैसाळ.

आमच्या विद्यालयातील शिक्षक कोरोना पाँझिटिव्ह आल्यानंतर आम्ही शालेय सल्लागार समिती व शिक्षक यांची मिंटिंग घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती आम्ही आमच्या वरीष्ठ कार्यालयाला कळवली आहे. सोशल डिस्टंस वापरून विध्यार्थ्यांचे स्वॅब घेतले जात आहेत. कोणीही घाबरून जाऊ नये.- संजय दबडे, शिक्षक, म्हैसाळ.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmiraj-acमिरजSangliसांगलीSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र