देवराष्ट्रे गावातून कोरोना हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:44+5:302021-06-21T04:18:44+5:30

फोटो ओळ : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे खासगी डाॅक्टरांनी कोरोना रुग्णांची योग्य ती रुग्णसेवा केली. देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. ...

Corona deported from Devarashtre village | देवराष्ट्रे गावातून कोरोना हद्दपार

देवराष्ट्रे गावातून कोरोना हद्दपार

फोटो ओळ : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे खासगी डाॅक्टरांनी कोरोना रुग्णांची योग्य ती रुग्णसेवा केली.

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील सात खाजगी डॉक्टर संस्थात्मक विलगीकरण केंद्रात मोफत सेवा देत आहेत.

गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी डॉक्टरांनी वज्रमूठ बांधली. यामुळे प्रशासनाला सहकार्य मिळत व ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

गावात लोकसहभागातून यशवंतराव चव्हाण विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. डॉ. गणेश कुंडले, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. अजित पवार, डॉ. वैभव पाटील, डॉ. संदीप मोहिते, डॉ. सुभोध मोरे, डॉ. दीपाली तांदळे यांनी

कोरोना योद्धा म्हणून जबाबदारी पार पाडली. लोकसहभागातून सुरू केलेल्या या विलगीकरण केंद्रात रुग्णांसाठी

चहा, नाश्ता, फळे, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, उकडलेली अंडी, पौष्टिक पदार्थ, सूप आदी सोयीसुविधा दिल्या आहेत.

येथे दररोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी येथील डॉक्टर व रोहिणी गवळी परिचारिका रुग्णांची ऑक्सिजन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून तात्काळ आरोग्य विभागाकडून तात्काळ कोरोना चाचणी घेतली जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना तात्काळ विलगीकरण केंद्रात दाखल केले जात आहे. योग्यवेळी उपचार मिळाल्याने बहुतांशी सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९५ च्या पुढे राहत आहे. यामुळे येथील रुग्णांना शक्यतो ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासलेली नाही.

Web Title: Corona deported from Devarashtre village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.