जिल्ह्यात ९०७ जणांना कोरोना; २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:27+5:302021-06-28T04:19:27+5:30

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोराेनाबाधितांच्या संख्येत रविवारी काहीशी घट झाली. रविवारी दिवसभरात ९०७ जणांना कोरोनाचे निदान होतानाच, परजिल्ह्यातील चौघांसह ...

Corona to 907 people in the district; 21 killed | जिल्ह्यात ९०७ जणांना कोरोना; २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ९०७ जणांना कोरोना; २१ जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोराेनाबाधितांच्या संख्येत रविवारी काहीशी घट झाली. रविवारी दिवसभरात ९०७ जणांना कोरोनाचे निदान होतानाच, परजिल्ह्यातील चौघांसह जिल्ह्यातील १७ अशा २१ जणांचा मृत्यू झाला. ८६० जण कोरोनामुक्त झाले तर म्युकरमायकोसिसचे दोन रुग्ण आढळले.

गेल्या दोन दिवसांपासून वाढतच चाललेल्या रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला. जिल्ह्यात १७ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली २, मिरज १, मिरज तालुक्यात ३, वाळवा, खानापूर, कवठेमहांकाळ प्रत्येकी २, आटपाडी, कडेगाव, तासगाव, शिराळा तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

रविवारी आरटीपीसीआर अंतर्गत २९९२ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यात ३९३ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ८७६८ जणांच्या नमुने तपासणीतून ५३७ जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या ८ हजार ५५४ जणांपैकी ९९६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यात ८४२ जण ऑक्सिजनवर तर १५४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.परजिल्ह्यातील चौघांचा मृत्यू तर २३ नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. म्युकरमायकोसिसचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १४२७५१

उपचार घेत असलेले ८५५४

कोरोनामुक्त झालेले १३०१७२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४०२५

पॉझिटिव्हिटी रेट ७.९१

रविवारी दिवसभरात

सांगली १६१

मिरज २१

आटपाडी ४२

कडेगाव ८६

खानापूर ४७

पलूस ३८

तासगाव ६२

जत ३०

कवठेमहांकाळ ६३

मिरज तालुका ९४

शिराळा ६८

वाळवा १९५

Web Title: Corona to 907 people in the district; 21 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.