जिल्ह्यात ८०१ जणांना कोरोना; १९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:28 IST2021-07-28T04:28:17+5:302021-07-28T04:28:17+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ होत मंगळवारी ८०१ नवे रुग्ण आढळले. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत १,१२३ ...

जिल्ह्यात ८०१ जणांना कोरोना; १९ जणांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ होत मंगळवारी ८०१ नवे रुग्ण आढळले. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत १,१२३ जण कोरोनामुक्त झाले, तर १९ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारचा पॉझिटिव्हिटी रेट ५.३५ टक्के इतका राहिला. म्युकरमायकोसिसचे नवीन ४ रुग्ण आढळले.
जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली ३, मिरज ३, तासगाव ३, मिरज तालुक्यात २, कवठेमहांकाळ १, वाळवा ४, पलूस १, जत २ रुग्णांचा समावेश आहे.
उपचार घेत असलेल्या ८,१८९ रुग्णांपैकी ८८४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ७२९ जण ऑक्सिजनवर, तर १४१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत ४३२६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २३२ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ८,१४० जणांच्या तपासणीतून ५७९ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील चौघांचा मृत्यू, तर नवीन १० रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,७१,९००
उपचार घेत असलेले ८,१८९
कोरोनामुक्त झालेले १,५९,१६१
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४,५५०
सोमवारी दिवसभरात
सांगली ६३
मिरज २३
आटपाडी ५९
कडेगाव १२४
खानापूर ६५
पलूस ६७
तासगाव ७०
जत ६०
कवठेमहांकाळ ४७
मिरज तालुका ८८
शिराळा १३
वाळवा १२२