सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी मोठी वाढ झाली. दिवसभरात ११२४ जणांना कोराेनाचे निदान होतानाच १२ जणांचा मृत्यू झाला. ९३५ जण कोरोनामुक्त झाले तर म्युकरमायकोसिसचे दोन नवे रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला.
बऱ्याच कालावधीनंतर मृत्यूसंख्या घटली असलीतरी बाधितांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील १२ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली १, वाळवा ५, शिराळा, आटपाडी २, पलूस, तासगाव प्रत्येकी १ जणांचा समावेश आहे.
प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून आरटीपीसीआर अंतर्गत ३७५३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ४६२ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ९४७८ जणांच्या नमुने तपासणीतून ६७७ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत ९८८० जण उपचार घेत आहेत त्यातील १००७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८६० जण ऑक्सिजनवर तर १४७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील १५ जण उपचारासाठी दाखल झाले.
चाैकट
म्युकरमायकोसिसचा धोका वाढतच चालला आहे. दिवसभरात दोन नवे रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १४८९११
उपचार घेत असलेले ९८८०
कोरोनामुक्त झालेले १३४९११
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४१२०
पॉझिटिव्हिटी रेट १२.३१
शनिवारी दिवसभरात
सांगली १५५
मिरज ४०
आटपाडी ४५
कडेगाव ७६
खानापूर ८६
पलूस ८७
तासगाव ७९
जत ३५
कवठेमहांकाळ २२
मिरज तालुका १५०
शिराळा ६७
वाळवा २८२