शहरं
Join us  
Trending Stories
1
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
2
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
3
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
4
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
5
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
6
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
7
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
8
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
9
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
10
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
11
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
12
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
13
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
14
VIRAL : १२वीच्या मुलाने गर्लफ्रेंडवर 'अशी' ठेवली पाळत; पद्धत बघून शेजाऱ्यांनाही बसला मोठा धक्का!
15
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
17
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
18
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
19
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
20
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आष्ट्यात मतदान वाढल्याच्या संशयावरून वादावादी; गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:45 IST

ईव्हीएम सुरक्षेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

आष्टा : चुकीच्या मतदानाची आकडेवारी समाजमाध्यमावर फिरू लागल्याने निर्माण झालेल्या संशयातून आष्टा येथे बुधवारी स्ट्राँग रूमबाहेर अधिकारी, नेते, कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. स्ट्राँग रूम बाहेर चोवीस तास सीसीटीव्ही तैनात करा, प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी स्ट्राँग रूमबाहेर नियुक्त करा, या भागात जॅमर बसवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान चुकीची माहिती समाजमाध्यमांत पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सांगितले.आष्टा नगरपालिका निवडणुकीसाठी दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची आकडेवारी वाढल्याच्या कारणावरून आष्टा शहर विकास आघाडी, शिंदेसेनेसह अपक्ष उमेदवार, कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल येथील स्ट्राँग रूमच्या ठिकाणी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला. अखेर प्रशासनाने आकडेवारीबाबत योग्य तो खुलासा केला.थेट नगराध्यक्ष पदासह १२ प्रभागांतील २४ जागांसाठी एकूण ३० हजार ५७३ मतदारांपैकी २२ हजार ८५६ मतदारांनी मतदान केले. एकूण ७४.७६ टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये एक हजार ३११ मतदारांपैकी ९९६ मतदारांनी मतदान केले; पण या प्रभागात सोशल माध्यमावर चार हजार ७७ मतदार दाखवून तीन हजार १०९ मतदारांनी मतदान केल्याचे दाखवले आहे.अशाच पद्धतीने प्रभाग चार, पाच, सहा व दहा या ठिकाणीही चुकीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे, तसेच एकूण मतदान ३३ हजार ३२८ मतदान असे दाखवून २४ हजार ९१३ मतदान झाल्याचे दाखवले असून, त्याची ७४.७५ टक्के आहे. ही चुकीची आकडेवारी सोशल माध्यमावर फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.याठिकाणी आमदार जयंत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे, शिंदेसेनेचे वीर कुदळे, नंदकुमार आटुगडे, विनय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते स्टाँग रूगच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आले. यावेळी पोलिसांनी धैर्यशील शिंदे यांना बाहेर काढले. यावरून आणखी वाद वाढला.

गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करणारआपण जिल्हा निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाला मतदानाची आकडेवारी कळवली आहे. त्यात कोणताही बदल नाही. याप्रकरणी केवळ संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरे काहीही नाही. सोशल माध्यमावर गैरसमज पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिली.

जयंत पाटील यांनी केली पाहणीआमदार जयंत पाटील यांनी आष्टा येथील विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल येथे भेट देऊन ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली व प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

ईव्हीएम सुरक्षेवर उपस्थित केले प्रश्नचिन्हआष्टा येथे नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरत ईव्हीएमची कडेकोट सुरक्षेची मागणी केली. स्ट्राँग रूम बाहेर चोवीस तास सीसीटीव्ही तैनात करा, प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी स्ट्राँग रूमबाहेर नियुक्त करा, या भागात जॅमर बसवा. पहिल्या रात्रीच हा गोंधळा झाला तर पुढे काय होईल? असे प्रश्न व मागण्या त्यांनी केल्या आहेत. एकूण मतदान व जाहीर केलेल्या मतदानात तफावत आहे. हे चुकीचे आहे. ही आकडेवारी जुळली नाही तर आम्ही आष्टा बंद करू, असा इशाराही आष्टा शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dispute over increased voting in Ashta; action on rumor spreaders.

Web Summary : Tension in Ashta over discrepancies in voting data led to arguments. Demands for CCTV, representatives at strong rooms, and jammers were made. Authorities assured action against those spreading misinformation and clarified the data, urging caution.