सांगली जिल्ह्यात 33 ठिकाणी कंटेनमेंट झोन; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 01:29 PM2020-05-24T13:29:23+5:302020-05-24T13:30:39+5:30

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णांचा संपर्क शोधणे, त्याच्या भागात संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याठिकाणी तातडीने प्रशासनातर्फे

Containment zones at 33 places in the district | सांगली जिल्ह्यात 33 ठिकाणी कंटेनमेंट झोन; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना

सांगली जिल्ह्यात 33 ठिकाणी कंटेनमेंट झोन; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना

Next

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला वाढत असतानाच, रुग्णांच्या संपर्कामुळे आणखी रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रशासनाने 33 ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. यात नागरी भागात ६, तर ग्रामीण भागात ठिकाणी कंटेनमेंट झोन असून, आयसीएमआरच्या नियमावलीनुसार २८ दिवसानंतर कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द करण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णांचा संपर्क शोधणे, त्याच्या भागात संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याठिकाणी तातडीने प्रशासनातर्फे कंटेनमेंट झोन जाहीर केला जात आहे. या क्षेत्रात सर्व व्यवहारास व वाहतुकीस पूर्णपणे प्रतिबंध असून, केवळ अत्यावश्यक सेवाच पुरविल्या जातात. या भागातील नागरिकांना घरपोच सेवा देण्याबरोबरच या भागातील स्वच्छतेस विशेष प्राधान्य दिले जात आहे.

जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन व त्यांचा कालावधी
गांधी चौक, इस्लामपूर २३ मार्च ते ४ मे, निगडी २५ एप्रिल ते २२ मे, कामेरी २५ एप्रिल ते २२ मे, दुधेभावी ३० एप्रिल ते २७ मे, कर्नाळ ३ मे ते ३० मे, अंकले ९ मे ते ५ जून, साळशिंगे ११ मे ते १७ जून, गव्हाण ४ मे ते ९ जून, भिकवडी १५ मे ते १० जून, कुंडलवाडी १६ मे ते ११ जून, जांभूळवाडी १८ मे ते १३ जून, आटपाडी १९ मे १४ जून, अंत्री खुर्द १९ मे ते १४ जून, रेड २० मे ते १५ जून, बलवडी २० मे ते १५ जून, आटपाडी गोंदीरा २० जून ते १५ जून, पिंपरी बुद्रुक २० मे ते १५ जून, विजयनगर १९ एप्रिल ते १६ मे, वाघमोडेनगर, कुपवाड २ मे ते २९ मे, रेव्हेन्यू कॉलनी ८ मे ते ४ जून, फौजदार गल्ली १३ मे ते ९ जून, होळीकट्टा, मिरज १३ मे ते ९ जून, लक्ष्मीनगर १७ मे ते १२ जून, भारतनगर, मिरज २१ मे ते १६ जून

Web Title: Containment zones at 33 places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.