शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत काँग्रेसला धक्का, माजी महापौर किशोर जामदारांसह विविध पक्षातील नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:43 IST

जातीपातीचे राजकारण करून पोळी भाजणार नाही

मिरज : महापालिकेत ज्याची निवडून येण्याची येण्याची क्षमता आहे, अशांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली मिळेल. मतांचे व जातीचे राजकारण करायला, राजकीय पोळी भाजायला मी आलो नाही. माणुसकी महत्त्वाची असते, त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेत राष्ट्रवादी मेळाव्यात सांगितले.मिरजेत अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते, माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह मिरजेतील माजी नगरसेवक व विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप उत्कर्ष खाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.अजित पवार पुढे म्हणाले, राज्यातील २९ पैकी चार मोठ्या महापालिका सोडल्या, तर अन्य महापालिका स्वतःच्या उत्पन्नावर शहराचा विकास करू शकत नाहीत. अशा महापालिकांना केंद्र, राज्य व अन्य निधी उपलब्ध होईल. शक्तिपीठ महामार्ग तयार करताना जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केलेल्या नेत्यांना आगीतून उठून फुफाट्यात पडलो, असे कधीही वाटणार नाही.यावेळी माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, करण जामदार, जुबेर चौधरी, आरीफ चौधरी, अंकुश कोळेकर, शुभांगी देवमाने, नर्गिस सय्यद, मालन हुलवान, श्रीमती रेखा विवेक कांबळे, बिलकिस बुजरूक शेख, चंद्रकांत हुलवान, आजम काझी, शरद जाधव, शकील पिरजादे, तानाजी रुईकर यांच्यासह विविध पक्षांतील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्व नाही : किशोर जामदारकाँग्रेस पक्षाने मला भरपूर पदे दिली. मात्र, सध्या काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्व नाही, खमक्या नेत्याची उणीव असल्याने शहराच्या विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे माजी महापौर किशोर जामदार यांनी सांगितले. तर ज्यांची निवडून येण्याची पात्रता नाही, अशांच्या हातात माजी मंत्री जयंत पाटील यांनी सूत्रे दिल्याने महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी संपल्याची टीका माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Miraj: Congress setback as leaders join Ajit Pawar's NCP.

Web Summary : Former Miraj mayor and other party leaders joined Ajit Pawar's NCP. Pawar pledged commitment to development and criticized reliance on vote politics. Leaders cited Congress's weak leadership as reason for defection.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेस