शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात कॉँग्रेसचा भाजपला धक्का

By admin | Updated: July 27, 2015 22:57 IST

चौदा ठिकाणी सत्ता : भाजपकडे सात, राष्ट्रवादीकडे चार ग्रामपंचायती

जत : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. राष्ट्रीय कॉँग्रेस १४, भारतीय जनता पार्टी ७, राष्ट्रवादी कॉँग्रेस ४, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, राष्ट्रीय समाज पार्टी १, स्थानिक विकास आघाडीस २ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळाली आहे. दहा ग्रामपंचायतीत संत्तातर झाले आहे. वळसंग, शेड्याळ, येळदरी, मेंढीगिरी, सनमडी, भिवर्गी, उटगी, सिद्धनाथ, शेगाव, तळेवाडी, गुगवाड, धावडवाडी, सिंगणहळ्ळी, उंटवाडी या चौदा ग्रामपंचायतीत कॉँग्रेसची सत्ता आली आहे. तिकोंडी, करेवाडी (तिकोंडी), निगडी (बुद्रुक), जाह्याळ (खुर्द), लमाणतांडा (उटगी), घोलेश्वर, लमाणतांडा (दरीबडची) या सात ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे, तर अंकले, डोर्ली, कुलाळवाडी, सोनलगी या चार ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेस अंकलगी, राष्ट्रीय समाज पक्षास कुडणूर, स्थानिक विकास आघाडीस मोरबगी व गुड्डापूर ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळाली आहे. शेड्याळ, येळदरी, मेंढेगिरी, सनमडी, भिवर्गी, शेगाव, सिंगणहळ्ळी, उंटवाडी, अंकलगी, कुडणूर या दहा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. वळसंग ग्रामपंचायतीत कॉँग्रेस पक्षाने सत्ता कायम राखली आहे. मेंढेगिरी ग्रामपंचायतीत भाजपचे कार्यकर्ते, बाजार समिती माजी संचालक रमेश बिराजदार यांची सत्ता होती. तेथे कॉँग्रेसचे सुरेश कांबळे यांनी बाजी मारली आहे. सनमडी ग्रामपंचायतीत भाजपचे पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांची सत्ता होती. त्यांना फक्त एक जागा मिळाली आहे, तर कॉँग्रेस पक्षाला आठ जागा मिळाल्या आहेत. सिंगनहळ्ळी ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता होती. कॉँग्रेसने त्यांच्याकडून सत्ता हस्तगत केली आहे. उंटवाडी ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता होती. तेथे सत्तांतर होऊन कॉँग्रेसला सहा, तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. भिवर्गी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य बिळ्यानी बिराजदार यांची सत्ता होती. तेथे संत्तातर होऊन कॉँग्रेसला सहा, तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. उटगी ग्रामपंचायतीत भाजपचे जत पंचायत समिती माजी सभापती बसवराज बिराजदार यांची सत्ता होती. तेथे संत्तातर झाले असून, त्यांना एकही जागा मिळाली नाही. संपूर्ण तेरा जागांवर कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. शेगाव ग्रामपंचायतीत भाजपचे माजी सरपंच लक्ष्मण बोराडे यांची सत्ता होती. येथे संत्तातर होऊन कॉँग्रेसला नऊ, तर भाजपला चार जागा मिळाल्या आहेत. तिकोंडीत काट्याची लढत होऊन कॉँग्रेसचे अ‍ॅड. हादीमणी यांना सहा, तर भाजपला सात जागा मिळाल्या. गुड्डापूर ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीची सत्ता आली आहे. (वार्ताहर)शेतकरी संघटनेचा चंचुप्रवेशवळसंग, शेड्याळ, येळदरी, मेंढीगिरी, सनमडी, भिवर्गी, उटगी, सिद्धनाथ, शेगाव, तळेवाडी, गुगवाड, धावडवाडी, सिंगणहळ्ळी, उंटवाडी या चौदा ग्रामपंचायतीत कॉँग्रेसची सत्ता आली आहे. तिकोंडी, करेवाडी (तिकोंडी), निगडी (बुद्रुक), जाह्याळ (खुर्द), लामणतांडा (उटगी), घोलेश्वर, लमाणतांडा (दरीबडची) या सात ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे, तर अंकले, डोर्ली, कुलाळवाडी, सोनलगी या चार ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला सत्ता मिळाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेस अंकलगी, राष्ट्रीय समाज पक्षास कुडणूर, स्थानिक विकास आघाडीस मोरबगी व गुड्डापूरमध्ये सत्ता मिळाली आहे. त्यांचा हा चंचुप्रवेश प्रस्थापितांना इशारा मानला जात आहे.