शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डोळा; पृथ्वीराज पवार यांचा आरोप

By अशोक डोंबाळे | Updated: April 24, 2025 12:50 IST

आयटी पार्क वरून काँग्रेस नेत्यांवर टीका

सांगली : काँग्रेसचे नेते आयटी हबसाठी जिल्हा प्रशासनाकडे जागा मागत आहेत. प्रत्यक्षात या हबसाठी अत्यंत योग्य असलेल्या मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेवर त्यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख नेत्यांचा डोळा आहे. तो मोह ते सोडणार आहेत का? मोक्याच्या जागांवर आपण डोळा ठेवायचा आणि विकासासाठी वेगळी जागा मागायची, हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.पृथ्वीराज पवार म्हणाले, सांगलीला आयटी, सिलिकॉन, स्कील युनिव्हर सिटी तत्सम नॅान पोल्युटीग इंडस्ट्री व्हावी, यासाठी आम्ही गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सांगलीतील तज्ज्ञांशी संवाद साधून त्याची दिशा ठरवली. सरकारकडे पाठपुरावा केला. सर्वांनी ताकद लावली तर त्यात आगामी काळात यश येईल. त्या अर्थाने आम्ही काँग्रेस नेत्यांच्या त्या मागणीचे स्वागतच करतो, मात्र त्यांच्या कृतीत आणि बोलण्यात फरक आहे. ते थेट मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेची मागणी का करत नाहीत ? महाविकास आघाडी सरकारचा काळात शासकीय डेअरी चा ५० एकराहून अधिक क्षेत्र हे सांगलीत रोजगार निर्मितीसाठी वापरले पाहिजे. शासकीय दूध डेअरीच्या जागेचा बाजार होता कामा नये, यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर जागेचा बाजार थांबला. अन्यथा, आज त्याचे तुकडे करून अनेकांनी ते वाटून खाल्ले असते. त्यात काँग्रेसच्या एका नेत्याच्या संस्थेस १० एकर तर दुसऱ्या एका नेत्याचा काॅलेजला १० एकर आणी उर्वरित ३० एकर राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या डेअरीला असा बाजार ठरला होता. कवलापूर विमानतळाचा जागे सोबतच ह्या अत्यंत मोक्याच्या जागेवर ही दरोडा घालायचा प्लॅन होता हे काही लपून राहिलेले नाही.

प्रदूषण विरहित उद्योग करणारसांगलीच्या विकासाला गती देण्यासाठी औद्योगिक क्षेत्र विकास, कवलापूर विमानतळ, आयटी , इलेक्ट्रॉनिक्स, कौशल्य विद्यापीठ तत्सम प्रदूषण विरहित उद्योग, आदी विषय आमच्या अजेंड्यावर आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्याबाबत सकारात्मक आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत त्याला साथ देत आहेत. त्यासाठी मिरज शासकीय दूध डेअरीची जागा महत्त्वाची आहे, असेही पृथ्वीराज पवार म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजmilkदूधBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस