शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: संजय परांजपे खून प्रकरणाची सखोल चौकशी करा, सुत्रधाराचा शोध घ्या; उदय परांजपे यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 19:18 IST

आणखी कोणाचा सहभाग याचा शोध घ्या

पलूस : पलूस शिक्षण संस्थेचे संचालक संजय परांजपे यांच्या खुनाच्या मागे अल्पवयीन युवकाव्यतिरिक्त आणखी कोणती शक्ती आहे काय? या खुनाचा खरा मास्टर माइंड मोकाट रहायला नको. तो जगासमोर आलाच पाहिजे. या खुनाची निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी मृत संजय परांजपे यांचे बंधू उदय परांजपे यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन युवकास गुन्हेगार समजून खुनाचा तपास थांबवू नये, अशी मागणी केल्याने परांजपे खून प्रकरणाच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.शिक्षण संस्था संचालक संजय परांजपे खून प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित अल्पवयीन युवकाने खुनाची कबुली पोलिसांना दिली असली तरी एक युवक इतका क्रूर व निर्दयी हत्या कशी करू शकतो. या पाठीमागे अजून कोण आहेत काय? याची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी परांजपे कुटुंबाकडून करण्यात येत आहे.परांजपे कुटुंबाच्या मते या दुःखद घटनेमुळे आमच्या कुटुंबाचे कधीही न भरून येणारे असे नुकसान झाले आहे. संजय कधीच परत कधीही येणार नाही हे जरी माहिती असले तरी खुनातील खरे चेहरे समाजापुढे येऊन त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. त्यामुळे पोलिसांनी अजून या प्रकरणाची सखोल चौकशी करून यात सहभागी असणाऱ्या व अल्पवयीन युवकास पाठीशी घालणाऱ्या सर्वांवर कारवाई केलीच पाहिजे अशी ठाम मागणी उदय परांजपे व कुटुंबीय यांनी केली आहे.उदय परांजपे यांनी म्हटले की, संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी अद्याप अनेक बाबींचा उलगडा झालेला नाही. या खुनाचे इतर पैलू उघड होणे अत्यंत गरजेचे आहे.दरम्यान, या घटनेमुळे पलूस परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी होत आहे. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, असेही उदय परांजपे यांनी स्पष्ट केले.संशयित कोणाकडे आला होतापोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित अल्पवयीन युवक रात्री वेळाने कोणाकडे व का आला होता. त्याने त्याच दिवशी सोबत हत्यार कसे आणले होते. तो खून करून जिन्याखाली एकटा मृतदेह लपवून कसा ठेवू शकतो. यासह काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे या खुनामागे कोण आहे काय? याचा कसून तपास करण्याची मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Paranjape murder demands deeper probe, find mastermind: Uday Paranjape

Web Summary : Uday Paranjape seeks thorough investigation into Sanjay Paranjape's murder, suspecting a mastermind beyond the arrested minor. Unanswered questions fuel demands for justice and uncovering all involved parties. Fear grips Palus.