शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामाची नशा अन् पोलिसांची झाली दशा

By admin | Updated: November 25, 2014 23:49 IST

करमाळेतील प्रकार : पहाटे उडाली पोलिसांची झोप

शिरशी : एरव्ही एखाद्या घटनेसंदर्भात पोलिसांना माहिती देण्यासाठी दूरध्वनी करावा आणि तात्काळ पोलीस हजर व्हावेत, ही आता दुर्मीळ बाब होत चालली आहे. मात्र आज करमाळे (ता. शिराळा) येथे दारुच्या व्यसनाच्या आहारी जाऊन मनोरुग्ण झालेल्या बहाद्दराने गावात दरोडा पडून खून झाल्याची माहिती पोलिसांना देताच, शिराळा पोलिसांचा फौजफाटा तासाभरात पोहोचला. पोलिसांच्या अचानकपणे झालेल्या या आगमनामुळे ग्रामस्थ मात्र भांबावून गेले होते.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हणमंत येळवे (रा. भैरववाडी, ता. शिराळा) हा तरुण कामानिमित्त मुंबईमध्ये असतो. त्याला दारुचे व्यसन असल्याने या पती-पत्नीमध्ये भांडणे होत होती. गेल्या आठवड्यात असेच भांडण करुन तो मेहुण्याच्या भीतीने गावी आला होता.
गावाकडे आल्यानंतरही सतत दारू पिऊन तर्र आणि पोटात अन्न नाही, त्यामुळे तो मनोरुग्ण बनला. सोमवारी तो करमाळे येथील नातेवाईकांकडे आला होता. मात्र पहाटे उठून तो एकटाच बाहेर पडला व त्याने औंढी येथे जाऊन, ‘करमाळ्यात दरोडा पडला आहे, तसेच एकाचा खून झाला आहे’, अशी अफवा पसरवली. हे ऐकून एका अज्ञाताने शिराळा पोलीस ठाण्यात दूरध्वनी केला.
खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी तात्काळ गाडी बाहेर काढली. तासाभरातच करमाळे गाठले. परंतु पोलिसांनी माहिती घेतल्यावर ही अफवा असल्याचे लक्षात आहे. शेवटी नातेवाईकांच्या जबाबदारीवर त्याला ताकीद देऊन प्रकरणावर पडदा टाकला आणि पोलीस निघून गेले. (वार्ताहर)


खऱ्याची पंचाईत
खोट्या तक्रारी पोलिसांत येण्याच्या घटना अनेक वर्षापासून सुरू आहेत. पोलिसांच्या शंभर क्रमांकावर यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलीस चक्रावून जातात. वास्तविक करमाळे येथील या घटनेत पोलिसांनी त्या तळीरामाला ताकीद दिली असली तरी, अशा घटनांमुळे कुणी खरी तक्रार दिली तर त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होण्याचे प्रकार घडू शकतात.