शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

सांगलीत अतिक्रमणे हटविताना अधिकारी-विक्रेत्यांत वादावादी : फेरीवाला संघटनेच्या अध्यक्षांविरुद्ध तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 1:43 PM

महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेच्या तिसºया दिवशी शनिवारीही वादावादी झाली. फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले आणि महापालिकेच्या

सांगली : महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेच्या तिस-या दिवशी शनिवारीही वादावादी झाली. फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले आणि महापालिकेच्या अधिका-यांमध्ये कारवाईवरून पुष्पराज चौकात जोरदार वादावादी झाली. अखेर पोलिसांनी येऊन वाद मिटविला. महापालिका अधिका-यांनी याप्रश्नी टेंगले यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेने सांगलीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली आहे. कारवाईच्या पहिल्याचदिवशी मारुती चौकात नगरसेवक बाळासाहेब गोंधळी व नगरसेविका पती हेमंत खंडागळे यांनी अधिकाºयांशी वाद घातला होता. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गोंधळी यांना नोटीस बजावली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा वादावादीचा प्रकार घडला. शनिवारी येथील हरभट रोड, बालाजी चौक, दत्त मारुती रोडवर कारवाई करण्यात आली. रस्त्यावर व्यवसाय करणारे हातगाडीवाले, विक्रत्यांना शिस्त लावत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.दुपारच्या टप्प्यात सिव्हिल हॉस्पिटलसमोरील गारपीरकडे जाणाºया रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली. येथील फळ विक्रते, हातगाडीवाले, चहाच्या टपºया आदी अशी सुमारे २० ते २५ अतिक्रमणे हटवण्यात आली. यावेळी किरकोळ विरोध झाला. कर्मवीर चौकातील पाच हातगाडीवाल्यांवर कारवाई सुरु होताच विक्रेत्यांनी जोरदार विरोध केला. फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले घटनास्थळी आले. त्यांनीही पालिकेचे अतिक्रमणविरोधी पक्षकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांच्याशी वाद घातला. न सांगता कारवाई कशी केली? आधी फेरीवाला धोरण राबवा, मगच कारवाई करा, अशी मागणी करत टेंगले यांनी पालिकेने जप्त केलेले हातगाडे परत घेतले. त्यामुळे जोरदार वादावादी झाली. काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. अधिकाºयांनी पोलिसांना पाचारण केले. त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. अखेर टेंगले यांच्याविरोधात घोरपडे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.

टॅग्स :Sangliसांगली