ताकारीत विविध विकासकामांचा आरंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:48+5:302021-08-18T04:31:48+5:30
बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीतर्फे ११ लाख ८७ हजारांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन राजारामबापू पाटील दूध संघाचे अध्यक्ष ...

ताकारीत विविध विकासकामांचा आरंभ
बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीतर्फे ११ लाख ८७ हजारांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन राजारामबापू पाटील दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच अर्जुन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
या विकासकामांत प्रामुख्याने मोफत शुध्द वाॅटर एटीएम उभारणी, ताकारी-इस्लामपूर रोडवर हायमास्ट प्लॅनची उभारणी, संग्राम पाटील, भास्कर पाटील यांच्या घराच्या परिसरातील रोडवर काॅंक्रिटीकरण, होलार वस्ती व दलित वसाहतीत प्लेव्हर ब्लाॅक बसवणे अशा विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या विकासकामांसाठी अंदाजे ११ लाख ८७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
या उद्घाटनप्रसंगी सरपंच अर्जुन पाटील, उपसरपंच रवींद्र पाटील, विशाल पाटील, दिलीप साळुंखे, पुरुषोत्तम तांदळे, प्रतिभा जाधव, प्रमिला पाटील, शोभा पाटील, रेखा वायदंडे, कुमार टोमके, कमलाकर भांबुरे, अमर वाटेगावकर, ए. टी. शिकलगार, रमेश पाटील मान्यवर उपस्थित होते.
170821\img-20210815-wa0309.jpg
ताकारी विकास कामांचे उद्घाटन करताना महानंदा दुध संघाचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील सरपंच अर्जून पाटील रवींद्र पाटील मान्यवर