शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सहलीला जायचं म्हणून घरातून उत्साहात निघाली, वाटेतच काळाने झडप घातली; एसटीच्या चाकाखाली सापडून तरुणी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:35 IST

शर्वरीच्या अपघाताची माहिती समजताच बहीण आणि आईला धक्काच बसला

सांगली : कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर दंडोबा डोंगरावर सहलीला जाऊन निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्याचे तिने ठरविले. घरातून परवानगी मिळवून उत्साहाच्या लाटेवर स्वार होत ती निघाली. काही मैत्रिणी पुढे गेल्या होत्या. तीही मोपेडवरून जात होती. मात्र, घरापासून काही अंतरावर गेल्यावरच काळाने तिच्यावर झडप घातली.

एका क्षणाचीही संधी न देता एसटीच्या बसच्या मागील चाकाखाली आल्याने ती ठार झाली. रहदारीच्या रस्त्यावरील हा अपघात पाहून अनेकजण सुन्न झाले. शर्वरी राजकुमार कुलकर्णी (वय २१, रा. कबाडे हॉस्पिटलच्या पाठीमागे, भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) हिच्या अपघातीमृत्यूनंतर एकुलती एक बहिण आणि आई यांचा आधारच निखळून पडला.

मृत शर्वरी कुलकर्णी ही सांगलीतील गणपतराव आरवाडे महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तिच्या मैत्रिणींनी गुरुवारी दंडोबा डोंगरावर सहलीला जाण्याचे ठरवले होते. त्यामुळे शर्वरी हिने मोठी बहीण सोनाली हिला सांगून तिची परवानगी घेतली होती. तसेच सहलीला जाण्याची बुधवारी तयारी केली होती.गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ती मोपेड (एमएच १०, सीजे २४५७) घरातून निघाली होती. बसस्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल या रस्त्यावरून ती निघाली होती. जय मातृभूमी मंडळाजवळून जमखंडी-मुंबई ही एसटी बस (एमएच १४, एलएक्स ५९२८) देखील त्याच मार्गाने जात होती. यावेळी एसटी चालकाने शर्वरी कुलकर्णी हिच्या मोपेडला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एसटीची मोपेडला धडक बसली. त्यामुळे शर्वरी रस्त्यावर पडून एसटीचे मागील चाक तिच्या डोक्यावरून जाऊन ती चिरडून ठार झाली.

रहदारीच्या रस्त्यावर हा अपघात झाल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केला. काही फुटावर जाऊन चालकाने एसटी थांबवली. त्यानंतर संतप्त नागरिकांच्या भीतीने खाली उतरून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच काही मिनिटात सांगली शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटवून पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी फारच भयानक चित्र होते. ते पाहूनच अनेकजण सुन्न झाले. पोलिसांनी पंचनामा उरकून स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह सिव्हिलमध्ये शवविच्छेदनासाठी आणला.पोलिसांनी मृत शर्वरीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. शर्वरीच्या आई, बहिणीला अपघाताची माहिती समजताच मोठा धक्का बसला. शर्वरीची बहीण सोनाली कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी चालक नितीन श्रीरंग शिंदे (रा. खंडोबाची वाडी, पोस्ट गोवे, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अपघातस्थळी अनेकजण सुन्नएसटीच्या धडकेनंतर खाली पडलेल्या शर्वरीच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे चेंदामेंदा होऊन ती क्षणात ठार झाली. अपघातस्थळावरचे चित्र पाहून अनेकजण सुन्न झाले. सहलीला निघालेल्या तरुणीचा क्षणात मृत्यू झाल्याचे समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

पितृछत्र हरपले अन् बहिणीचीही साथ सुटलीशर्वरीच्या अपघाताची माहिती समजताच बहीण आणि आईला धक्काच बसला. शर्वरीच्या वडिलांचे निधन झाले असून आई, बहिणीसह ती राहत होती. पितृछत्र हरपल्यानंतर आता छोट्या बहिणीची साथ सुटल्याने मोठ्या बहिणीला धक्का बसला.

रस्त्यावर कोंडी कायमअपघात झालेल्या ठिकाणी रस्ता अरुंद आहे. दुकानगाळ्यासमोर वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जातात. जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो. याच ठिकाणी तरुणीचा अपघाती बळी गेल्यामुळे या रस्त्यावरील कोंडी दूर करणार काय, असा प्रश्न अनेकजण विचारत होते.