सिरो सर्व्हेमध्ये जिल्हाभरात ४९६ नमुन्यांचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:40+5:302021-06-29T04:18:40+5:30
सांगली : कोरोनानंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या प्रतिजैविकांच्या चाचपणीसाठी आरोग्य विभागाने ४९६ जणांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. चार दिवसांपूर्वी पुणेस्थित ...

सिरो सर्व्हेमध्ये जिल्हाभरात ४९६ नमुन्यांचे संकलन
सांगली : कोरोनानंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या प्रतिजैविकांच्या चाचपणीसाठी आरोग्य विभागाने ४९६ जणांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. चार दिवसांपूर्वी पुणेस्थित पथकाने जिल्ह्यात ठिकठिकाणी भेटी देऊन नमुने संकलित केले. त्यांचा अहवाल आठवडाभराने मिळेल.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेण्यासाठी हे सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे. महापालिका क्षेत्रात शुक्रवारपासून (दि.२५) नमुने घेण्याचे काम चालले. त्याचवेळी ग्रामीण भागातही पथकाने भेटी दिल्या. संकलित केलेल्या नमुन्यांची तपासणी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत केली जाईल. कोरोनाविरोधात शरीरात तयार झालेल्या प्रतिजैविकांचे प्रमाण तपासले जाईल. या नमुना चाचणीतून जिल्ह्यात किती टक्के लोकांत प्रतिजैविके तयार झाली याचा अंदाज जाहीर केला जाईल.
शासकीय व आरोग्य संस्थांच्या स्तरावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्हा कितपत सक्षम आहे. याचा अंदाजही या सर्वेक्षणातून स्पष्ट होणार आहे.
चौकट
वयोगटनिहाय घेतले नमुने
२ ते ९ वर्षे, ९ ते १८ वर्षे व १८ वर्षांवरील वयोगटानुसार रक्ताचे नमुने घेण्यात आले. ताकारी, कुंडल, शिवणी, येळावी, नांद्रे, आगळगाव, हळ्ळी, विटा येथे नमुने घेण्यात आले. महापालिका क्षेत्रात तसेच मिरज वैद्यकीय महाविद्यालयातूनही रक्त घेण्यात आले.