सहकार पॅनलने सभासदांचे हित जपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:18+5:302021-06-26T04:19:18+5:30

बोरगाव : साखर कारखानदारी ही राजकारणाचे कुरूक्षेत्र नाही तर सहकारी साखर कारखानदारी हा व्यवसाय आहे, हे विरोधकांनी नेहमी लक्षात ...

The co-operation panel looked after the interests of the members | सहकार पॅनलने सभासदांचे हित जपले

सहकार पॅनलने सभासदांचे हित जपले

बोरगाव : साखर कारखानदारी ही राजकारणाचे कुरूक्षेत्र नाही तर सहकारी साखर कारखानदारी हा व्यवसाय आहे, हे विरोधकांनी नेहमी लक्षात ठेवावे. त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा नेहमी पारदर्शक असावा, यात सभासद व साखर कारखान्याचे हित जपायला हवे. सहकार पॅनलच्या माध्यमातून ते नेहमीच जपले असल्याचे मत सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.

बोरगाव (ता. वाळवा) येथील क्रांती परिवाराच्यावतीने आयोजित सभासदांच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राज्य बॅंकेचे अध्यक्ष माणिकराव पाटील होते.

सुरेश भोसले म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीचा विकास साधायचा असेल तर पक्षविरहीत कामकाज करायला हवे. ते सहकार पॅनलचे करत आहे. या पॅनलमध्ये सर्वच पक्षांचे उमेदवार आहेत. वाळवा तालुक्यातून राष्ट्रवादीने भक्कम उमेदवार दिल्याने अनेकांना प्रश्न पडलेत; मात्र वाळवा तालुक्याने नेहमीच सत्याची पाठराखण केली आहे, हाही इतिहास आहे.

यावेळी विष्णूपंत शिंदे, माणिक शा. पाटील, अभिजित पाटील, संजय पाटील, गणपतराव पवार, शंकर पाखले, प्रमोद शिंदे, सुरेश पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: The co-operation panel looked after the interests of the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.