शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

मिरजेत दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक-नगरसेवकांत वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 6:53 PM

मिरज शहरात काही भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुजावर गल्ली परिसरात दूषित पाण्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना जाब विचारल्याने वादावादीचा प्रकार घडला. मुजावर गल्ली येथे टँकरने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देमिरजेत दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक-नगरसेवकांत वादावादी

मिरज : मिरज शहरात काही भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुजावर गल्ली परिसरात दूषित पाण्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना जाब विचारल्याने वादावादीचा प्रकार घडला. मुजावर गल्ली येथे टँकरने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला.दर्गा परिसरातील मुजावर गल्ली परिसरात महिनाभर अपुरा, कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळत असल्याने या परिसरात दूषित पाणीपुरवठा होऊन अनेक नागरिकांना जुलाब व उलट्या होत आहेत.महापालिका पाणीपुरवठा विभाग तक्रारीची दखल घेण्यात येत नसल्याने आज नागरिक दूषित पाणी घेऊन नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांच्या कार्यालयात गेल्यानंतर नगरसेवक मैनुद्दीन बागवान व डॉ. नर्गिस सय्यद हे मुजावर गल्लीत पाहणीसाठी गेले.यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना जाब विचारत किमान रमजान महिन्यात शुध्द पाणीपुरवठ्याची मागणी केल्याने नगरसेवकांसोबत वादावादी झाली.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील जलवाहिनीला गळतीमुळे सांडपाणी जलवाहिनीत जात असून, जलवाहिन्यांची स्वच्छता केल्यानंतरही दूषित पाण्याची समस्या कायम आहे. यामुळे आजपासून मुजावर गल्ली परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.मैनुद्दीन बागवान यांनी दूषित पाण्याची समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाविरुध्द आंदोलनाचा इशारा दिला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली