Sangli: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू, मिरजेतील घटना
By संतोष भिसे | Updated: January 18, 2024 18:43 IST2024-01-18T18:43:33+5:302024-01-18T18:43:43+5:30
रेल्वे उड्डाण पुलासाठी रेल्वेच्या जागेत खोदाई करण्यात आली

Sangli: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू, मिरजेतील घटना
मिरज : मिरजेत उत्तमनगरशेजारी रेल्वे हद्दीत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून अभिषेक रेखा ठोकळे (वय ८) या बालकाचा मृत्यू झाला. अभिषेक काल, बुधवारी (दि. १७) खड्ड्याजवळ खेळत असताना पाण्यात पडल्याने ही दुर्घटना घडली.
मिरजेत रेल्वे उड्डाण पुलासाठी रेल्वेच्या जागेत खोदाई करण्यात आली आहे. तेथे मुरूम काढल्याने मोठे खड्डे तयार झाले आहेत. जवळच कृष्णाघाट येथून मिरज शहरापर्यंत आलेल्या मोठ्या जलवाहिनीतून गळती झाली आहे. त्याचे पाणी खड्ड्यात साचले आहे. अभिषेक तेथे खेळत असताना खड्ड्यात पडला, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. अभिषेकच्या मृत्यूस रेल्वे प्रशासन व ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यांच्यावर कारवाईची मागणी रिपाईंचे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी केली.