शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: जयंत पाटीलविरोधी एकत्र गटासाठी चेंडू मुख्यमंत्र्यांकडे, विकास आघाडीचे जुळता-जुळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 20:24 IST

Local Body Election: बंडोबांचे पेव फुटणार, मतदारांना सुगीचे दिवस

अशोक पाटीलईश्वरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे उरूण - ईश्वरपूर नगरपालिकेच्या रणांगणात जय्यत तयारीने आपला फौजफाटा उतरवण्याच्या प्रयत्नात आहेत. याउलट विरोधी गटात आजही जुळता जुळेना, अशी स्थिती आहे. त्यामुळे विकास आघाडीच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांनी आपली प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे.जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर १५ प्रभागांतील आपले उमेदवारही निश्चित केल्याचे समजते. विरोधातील भाजप, शिंदेसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी जुळता जुळेना, असे चित्र आहे. यावर विस्कळीत स्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच तोडगा काढतील, अशी चर्चा विरोधी गटात सुरू आहे. विविध प्रभागांतील जागा वाटपावरून विकास आघाडीमध्ये एकमत नसल्याने काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या पातळीवर प्रचारही सुरू केला आहे.विकास आघाडीची मोट बांधण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राहुल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांना एकत्र करावे लागणार आहे. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. तरीही त्यांच्यात जागा वाटपावरून मतभेद कायम आहेत. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांची विचारसरणी वेगळ्या दिशेने विचार करत आहे. त्यामुळेच जयंत पाटील विरोधी गटाची मोट बांधण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: सरसावणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.मतदारांना सुगीचे दिवसशहरातील प्रभाग १, ५, ६ मध्ये इच्छुकांची संख्या पाहता विकास आघाडीतील नेत्यांपुढे मोठे आव्हान उभे आहे. जयंत पाटील गटात उमेदवारी मिळवण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या रणांगणात बंडोबांचे पेव फुटणार आहे. या स्थितीत मतदारांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Politics: CM to decide on Jayant Patil opposition alliance.

Web Summary : Jayant Patil prepares for municipal elections, while opposition struggles to unite. Factionalism within the opposition alliance might need Chief Minister Fadnavis' intervention. Disagreements persist over seat allocation; voters may benefit from the divisions.