शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

Sangli Crime: खोटे लग्न लावून देत नवरदेवाला घातला दोन लाखांचा गंडा, पाच जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:34 IST

विवाहाच्या दुसऱ्याच दिवशीच संधी साधून घरातून धूम ठोकली

विटा : पलूस येथील नवरदेवाला २ लाख ५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी नवरदेव हरीश मोहन जाधव (वय ३३,मूळगाव सांगलीवाडी,सध्या रा. पलूस, जि. सांगली) याने दिलेल्या तक्रारीनुसार वधू संगीता कृष्णा चव्हाण (रा. पालघर), एजंट वर्षा बजरंग जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर), बंडू पुंडलिक साळुंखे, बजरंग गणपती साळुंखे व राजू आप्पू घारगे (सर्व रा. मंगसुळी, ता. अथणी, जि. बेळगाव) या पाच ठकसेनाविरुद्ध विटा पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.सांगलीवाडी येथील हरिश जाधव हे कुटुंबीयांसह पलूस येथे राहण्यास आहेत. त्यांचे मंगसुळी (कर्नाटक) येथे नातेवाईक आहेत. वडील मोहन मंगसुळीला गेल्यानंतर त्यांनी नातेवाईक बंडू पुंडलिक साळुंखे यांना हरिशसाठी स्थळ पाहण्यास सांगितले. बंडू साळुंखे याने मुलगी असल्याचे सांगून सुलतानगादेतील एजंट वर्षा जाधव हिच्याशी संपर्क केला. वर्षाने पालघर येथील संगीता चव्हाण हिचे स्थळ सुचविले. बंडू साळुंखे, बजरंग साळुंखे व राजू आप्पू घारगे यांच्या मध्यस्थीने २ लाख ५ हजार रुपये देण्याच्या बोलीवर विवाह ठरला.त्यानंतर हरिश व मोहन जाधव यांनी वर्षा हिच्याकडे रोख ४५ हजार रुपये दिले. त्यानंतर पलूस येथे १ लाख ६० हजार असे एकूण २ लाख ५ रुपये दिले. रक्कम हातात मिळाल्यानंतर १६ ऑगस्ट २०२२ रोजी हरिशचा संगीता चव्हाण हिच्याशी विवाह लावून दिला. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाच्या आजीचे सांगलीवाडी येथे निधन झाल्याने वधू संगीता सोडून सर्वजण पलूसहून सांगलीवाडीला गेले. ही संधी साधून संगीता हिने घरातून धूम ठोकली.काही वेळाने हरिशचे नातेवाईक सांगलीवाडीहून पलूसला आल्यानंतर संगीता घरी नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शोध घेतला असता ती किर्लोस्करवाडी रेल्वेस्थानकावर सापडली. त्याचक्षणी त्यांनी संगीताला एजंट वर्षा हिच्या स्वाधीन केले. हरिश व त्यांच्या वडिलांनी हरिशचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून द्या किंवा दिलेले दोन लाख पाच हजार रुपये परत द्या, असा तगादा वर्षाकडे लावला.वर्षाने पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरिशने खोटे लग्न लावून देत आपली २ लाख ५ हजाराची फसवणूक केल्याची फिर्याद दिल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी