शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून ग्रामीण भागात फसवणूक : बेकायदेशीर उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:41 PM

संख : दरीबडची (ता. जत) येथे २०१६ मध्ये लकी ड्रॉ काढण्यात आले होते. ‘जेवढी तिकिटे, तेवढी बक्षिसे’ असे आमिष दाखवून तीन हजार तिकिटे खपविण्यात आली होती. ग्राहकांना बंपर बक्षिसे तर दिलीच नाहीत. तसेच सोडतीनंतर फॅन, फिल्टर, इस्त्री, मिक्सर, रोटीमेकर, थर्मास, कुकर, इन्व्हर्टर यासारखी मोठ्या संख्येने असलेली बक्षिसे बनावट, निकृष्ट दर्जाची ...

ठळक मुद्देलाखोंचा गंडा; निकृष्ट वस्तू माथी मारण्याचा प्रकार

संख : दरीबडची (ता. जत) येथे २०१६ मध्ये लकी ड्रॉ काढण्यात आले होते. ‘जेवढी तिकिटे, तेवढी बक्षिसे’ असे आमिष दाखवून तीन हजार तिकिटे खपविण्यात आली होती. ग्राहकांना बंपर बक्षिसे तर दिलीच नाहीत. तसेच सोडतीनंतर फॅन, फिल्टर, इस्त्री, मिक्सर, रोटीमेकर, थर्मास, कुकर, इन्व्हर्टर यासारखी मोठ्या संख्येने असलेली बक्षिसे बनावट, निकृष्ट दर्जाची देऊन ग्राहकांची बोळवण केली आहे.

बोगस लकी ड्रॉमध्ये लाखो रूपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. याकडे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी लक्ष देऊन बोगस लकी ड्रॉची चौकशी करून कार्यवाही करावी व ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.

पूर्व भागातील दरीबडची येथे मे २०१६ मध्ये साईबाबा सेवाभावी संस्थेतर्फे लकी ड्रॉ काढण्यात आला होता. बक्षिसे म्हणून महागड्या वाहनांची छायाचित्रे छापून तिकिटे खपवली होती. पहिले बक्षीस महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी ठेवण्यात आली होती. बुलेट, हिरो होंडा, बजाज गाड्या, टीव्ही, फ्रीज ही पाच बक्षिसे ठेवण्यात आली होती. ‘जेवढी तिकिटे, तेवढी बक्षिसे’ ‘एक कूपन, एक वस्तू’ अशा योजनांचे आमिष ग्राहकांना दाखविण्यात आले होते. तिकिटाची रक्कम प्रथम १ हजार रूपये व बक्षिसे नेतेवेळी ५०० रूपये अशी ठेवण्यात आली होती. यामधून कोट्यवधीची रक्कम गोळा झाली होती.

लकी ड्रॉ जून २०१६ मध्ये काढण्यात आला. बंपर बक्षिसे भिवर्गी, खंडनाळ, संख, दरीबडची येथील ग्राहकांना लागली होती. सोडतीनंतर बंपर बक्षिसे दिलीच नाहीत. तसेच मोठ्या संख्येने असलेली बक्षिसे हैदराबाद येथे दुय्यम वर्गाची, बनावट खरेदी करून ती देण्यात आली. यातून ग्राहकांची फसवणूक, लुबाडणूक करण्यात आली आहे.+गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं!पूर्व भागातील दरीबडची हे शांत व सुसंस्कृत गाव आहे. पण बोगस लॉटरीवाल्यांमुळे गाव चांगले असतानासुध्दा गावाची नाहक बदनामी झाली आहे, फसवणूक झाली आहे. गाव तसं चांगलं, पण लॉटरीवाल्यांनी वेशीला टांगलं, असे म्हणण्याची वेळ आली आहे.दरीकोणूर येथे मारहाणदरीकोणूर येथील चालकाला बोगस लकी ड्रॉची सोडत काढताना पकडून बेदम चोप दिला होता. त्याची चारचाकी मोटार ओढ्यात ढकलून दिली होती. त्याचे अपहरण करून घरातून पैसे नेले होते. ग्राहकांना पैसे देऊन प्रकरण परस्पर मिटविण्यात आले होते.दुष्काळी निधीसाठी मदतलकी ड्रॉ तिकिटे खपविण्यासाठी व ग्राहकांचा विश्वास बसावा यासाठी, बक्षिसांचे वितरण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते केले जाणार आहे. लकी ड्रॉच्या फायद्यातील रक्कम दुष्काळी निधीसाठी देण्यात येणार आहे, अशी जाहिरात ध्वनिक्षेपक लावून करण्यात आली. पण प्रत्यक्षात कोणताच कार्यक्रम झाला नाही, दौराही नव्हता.