शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह विभागात नोकरीच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक; शिराळा, कोल्हापुरातील ठकसेनांची करामत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:55 IST

ईश्वरपूर : कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक पदाची सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत कापूरवाडी-पेठ (ता.वाळवा) येथील एकाची चौघांच्या टोळीने १३ ...

ईश्वरपूर : कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक पदाची सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत कापूरवाडी-पेठ (ता.वाळवा) येथील एकाची चौघांच्या टोळीने १३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. हा प्रकार नोव्हेंबर २०२४ मध्ये घडला.याबाबत अर्जुन अण्णासाहेब देशमुख (वय ५३,रा.विष्णूनगर,कापूरवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाजीराव जोती पाटील (रा.वाडीभाग,शिराळा), गणेश दिनकर जाधव, नागेश दिनकर जाधव, मनीषा गणेश जाधव (तिघे रा.पाचगाव-कोल्हापूर) अशा चौघांविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरील चौघांनी संगनमत करत अर्जुन देशमुख यांचा मुलगा नेताजी याला कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक या पदावर सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी बाजीराव पाटील यांच्या सांगण्यावरून अर्जुन देशमुख यांनी पाचगावच्या जाधव कुटुंबाला वेळोवेळी १५ लाख १० हजार रूपये दिले होते. मात्र, देशमुख यांच्या मुलाला नोकरी न लागल्याने त्यांनी पैशासाठी तगादा लावल्यावर या ठकबाजांनी देशमुख यांना २ लाख रुपये परत केले. तसेच राहिलेली १३ लाख १० हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यावर देशमुख यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या चौघांविरुद्ध पोलिसात धाव घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Job Scam: ₹13 Lakhs Fraud in Prison Department; Shirala Connection

Web Summary : A gang cheated a man from Kapurwadi-Peth of ₹13.1 lakhs promising a government job in the prison department. Police have registered a case against four individuals from Shirala and Kolhapur for fraud and breach of trust after failing to deliver on the job promise.