शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली धरणातून २५८० क्यूसेकने विसर्ग सुरू, धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 11:33 IST

विकास शहा शिराळा : परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने चांदोली धरण १०० टक्के भरले आहे. गेली दोन दिवस अतिवृष्टी ...

विकास शहाशिराळा : परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने चांदोली धरण १०० टक्के भरले आहे. गेली दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता धरणाचे वक्राकार दरवाजे उघडण्यात आले. वीजनिर्मिती केंद्रातून १३८० व दरवाज्यातून १२०० असा एकूण २५८० क्यूसेकने विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे चांदोली पाटबंधारेचे शाखाधिकारी गोरख पाटील यांनी सांगितले.जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र या गेल्या काही दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे दि.९ सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. बुधवार दि.१८ रोजी  दोन्ही वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आला होते. विसर्ग बंद केल्याने  दि.२५ रोजी सकाळी सात वाजता धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र गेली दोन दिवस पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने दोन्ही वीजनिर्मिती केंद्र सुरू केले आहेत. तसेच आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. ५ सप्टेंबर रोजी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती यामुळे दोन वक्राकार  दरवाजे उघडण्यात आले होते.दि.१८ रोजी सकाळी एक तर दुपारी दोन वाजता दुसरे वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद झाला होता. आज वीजनिर्मिती केंद्रातून १३८० व दरवाज्यातून १२०० असा एकूण २५८० क्यूसेक ने विसर्ग सुरू झाला आहे.चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी मिळताच वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. पाथरपुंज येथे आज सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रातील  पाथरपुंज येथे ९०, निवळे ४८, धनगरवाडा ३७, चांदोली ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणात एकूण ३४.४० टीएमसी म्हणजेच १०० टक्के साठा आहे. उपयुक्त २७.५२ टीएमसी साठा आहे.चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिमी मध्ये

  • पाथरपुंज येथे - ९० (७८४८) 
  • निवळे - ४८ (६३१४)
  • धनगरवाडा - ३७ (३८३०) 
  • चांदोली धरण - ३० (३७९०)
टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरणWaterपाणी