शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

Sangli: चांदोली धरण निम्मे भरले, कोकरुड-रेठरे बंधारा पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:36 IST

मोरणा धरणाच्या सांडव्यातून पाणी बाहेर  

शिराळा : शिराळा शहरास तालुक्यात पावसाच्या लहानमोठ्या सरी सुरूच आहेत. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने चांदोली धरण ५३.४० टक्के भरले आहे. शहरासह आसपासच्या गावांना पाणीपुरवठा करणारे मोरणा धरण गुरुवारी (दि. १९) सायंकाळी सातच्या दरम्यान, तर शिवणी तलाव शुक्रवारी दुपारच्या दरम्यान भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे. शिराळा पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असून, कोकरुड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे.पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव, अंत्री बुद्रुक तलाव, रेठरे धरण अगोदरच भरले असून, आता मोरणा धरण गुरुवारी सायंकाळी सातच्या दरम्यान व शिवणी धरण शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान शंभर टक्के भरून सांडव्यांतून पाणी बाहेर पडले आहे. गिरजवडे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा स्थिर आहे. सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले यामुळे मोठे नुकसान झाले आहे.चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, चांदोली येथे अतिवृष्टी सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गतवर्षी १०.४२ टीएमसी पाणीसाठा होता, तर यावर्षी १७.९९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरणात ११ हजार २५० क्यूसेकने आवक, तर वीजनिर्मिती केंद्रातून १५३० क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दि. २३ मेपासून आज अखेर ४.५५ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शिराळा, मांगले, सागाव, कोकरूड, आरळा, चरण, वाकुर्डे, शिरशीसह तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे.शिराळा परिसरातील तलाव व धरणातील पाणीसाठामोरणा धरण - १०० टक्केकरमजाई तलाव- १०० टक्केमानकरवाडी तलाव - १०० टक्केशिवणी तलाव - १०० टक्केटाकवे तलाव - ७५ टक्केरेठरे धरण - १०० टक्केकार्वे तलाव - ३३ टक्केगिरजवडे मध्यम प्रकल्प- ७२ टक्केचांदोली धरण- ५२.२८ टक्के

मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिलीमीटरमध्येकोकरूड २०.८० (२३५.५०)शिराळा ४ (१८३.१००)शिरशी २९.३० (२४३.३०)मांगले ४ (१६६.६० )सागाव ५.८० (१५६.१०)चरण ३७.८० (३९०.३०० )वारणावती ७१ (५२९.००)