चांदोली धरण ५४.८३ टक्के भरले; धरण परिसरात सलग सहा दिवस अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 16:26 IST2022-07-12T16:22:05+5:302022-07-12T16:26:58+5:30
गेल्या चोवीस तासांत ८८ मिलिमीटरसह एकूण ८०८ मिलिमीटर पाऊस झाला.

चांदोली धरण ५४.८३ टक्के भरले; धरण परिसरात सलग सहा दिवस अतिवृष्टी
-अशोक डोंबाळे
सांगली : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून, गेले सहा दिवस अतिवृष्टीची नोंद होत आहे. धरणात १८.८६ टीएमसी पाणीसाठा झाला असून ५४.८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. शिराळा तालुका वगळता अन्य जिल्ह्यात पावसाने उघडीप आहे.
गेल्या चोवीस तासांत ८८ मिलिमीटरसह एकूण ८०८ मिलिमीटर पाऊस झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून १५ हजार ३९१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन सध्या १८.८६ टीएमसी साठा झाला आहे. त्याची टक्केवारी ५४.८३ अशी आहे. पाणी पातळी ६०८.८० मीटर झाली आहे. अद्यापही पावसाची संततधार कायम सुरूच आहे.