शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

बालगावमध्ये ८८४ वर्षांपूर्वीचा चालुक्यकालीन शिलालेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:06 IST

history News Sangli- जत तालुक्यातील बालगाव येथे चालुक्यराजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल याच्या कारकिर्दीतील त्याचा मांडलिक बिज्जल कलचुरी याने दिलेला सन  ११३७ मधील सुमारे ८८४ वर्षांपूर्वीचा दानलेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांनी शोधून काढला आहे.

ठळक मुद्देबालगावमध्ये ८८४ वर्षांपूर्वीचा चालुक्यकालीन शिलालेखबिज्जल कलचुरी राजाने सुर्यग्रहणाच्या दिवशी दान दिल्याचा उल्लेख

सांगली : जत तालुक्यातील बालगाव येथे चालुक्यराजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल याच्या कारकिर्दीतील त्याचा मांडलिक बिज्जल कलचुरी याने दिलेला दानलेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांनी शोधून काढला आहे. सन  ११३७ मधील हा लेख असून, यामध्ये बालगाव येथील कळमेश्वर स्वामी यांना दान दिल्याचे म्हटले आहे. सुमारे ८८४ वर्षांपूर्वीच्या या लेखातून सांगली जिल्ह्याच्या तत्कालीन राजकीय व धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे.बालगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले सांगली जिह्यातील शेवटचे गाव आहे. पंढरपूर-विजापूर महामार्गावर वसलेल्या या गावाला प्राचीन इतिहास आहे. येथील अल्लमप्रभूचे देवस्थान हे महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकात प्रसिध्द आहे. याच बालगावमध्ये मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे संशोधन करीत असताना त्यांना अल्लमप्रभू देवस्थानालगत हळेकन्नड लिपितील एक शिलालेख आढळून आला.

तो भग्नावस्थेत होता. त्याच्या वरच्या भागातील १३ ओळीच फक्त शिल्लक राहिल्या आहेत. या शिलालेखावर सुर्य-चंद्र, शिवलिंग, गाय-वासरू, कटय़ार अशी चिन्हे कोरली आहेत. हा शिलालेख पूर्वी मारुतीच्या देवळात होता. शिलालेख अभ्यासासाठी सागर कांबळे, डॉ. महेंद्र बोलकोटगी (जमगी), प्रभाकर सलगर (बालगाव), मधू पाटील (बालगाव) यांची मदत झाली.

बालगांवमधील लेखात तो मंगळवेढे येथून राज्य करीत असल्याचा उल्लेख आहे. या लेखात त्याला लावलेल्या विशेषणांमध्ये युध्दात शत्रूला अत्यंत घनघोर वाटणारा, शूरवीरांचा सूर्य, कलिकालाच्या गळ्यावर रोखलेला अंकुश, शत्रूरुपी हत्तींचा नाश करणारा सिंह, निर्भयपणे पराक्रम गाजविणारा वीर आणि परनारी सहोदर म्हणजे परस्त्रीचा बंधू यांचा समावेश आहे. त्याने बालगावमधील एका स्वामींना पिंगळनाम संवत्सराच्या वर्षी सोमवार असताना कार्तिक महिन्यात दान दिल्याचे म्हटले आहे.

मिरज इतिहास संशोधक मंडळाच्या अभ्यासकांना बालगांव येथे सापडलेल्या या नव्या शिलालेखामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे ८८४ वर्षांपूर्वीच्या राजकीय आणि धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे.

बिज्जल कलचुरी याच्या ताब्यात सध्याच्या सांगली जिल्ह्याचा बहुतांशी भाग होता. त्यामुळे जिल्ह्याच्या  विविध भागात त्याचे शिलालेख आजवर आढळून आले आहेत. यामध्ये देशिंग-बोरगांव, भाळवणी, वळसंग याठिकाणी त्याच्या कारकिर्दीतील शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखांमधून कल्याणीचे चालुक्य राजे आणि त्यांचे मांडलिक असलेल्या कलचुरी राजसत्तांची माहिती मिळते.

बिज्जल कलचुरीचा हा कालदृष्टय़ा पहिला शिलालेख

यावेळी चालुक्यराजा भूलोकमल्ल तथा तिसरा सोमेश्वर याच्या राज्यारोहणाचे १३ वे वर्ष सुरू होते. बिज्जल कलचुरीचा हा जिल्ह्यात सापडलेला कालदृष्टय़ा पहिला शिलालेख आहे. बिज्जल कलचुरी हा चालुक्यांचा नातेवाईक होता. चालुक्यराजा सहावा विक्रमादित्याची पत्नी चंदलदेवी ही बिज्जलाची आजी होती. बिज्जल राजा हा पराक्रमी होता. प्रारंभी तो चालुक्यांचा मांडलिक असला तरी त्याने ११५६ मध्ये चालुक्याचे मांडलिकत्त्व झुगारुन देऊन सध्याच्या सांगली, सातारा, सोलापूर या भूभागावर आपली सत्ता प्रस्थापित केली.सुर्यग्रहणाच्या दिवशी दान दिल्याचा उल्लेखया लेखात बालगावमधील कळमेश्वर स्वामींना बिज्जल कलचुरी राजाने सुर्यग्रहणाच्या दिवशी दान दिल्याचा उल्लेख आहे. या लेखाच्या प्रारंभी कलचुरी राजा बिज्जल याच्या बिरुदावल्या आल्या आहेत. कलचुरी राजांमध्ये बिज्जल कलचुरी हा पराक्रमी राजा होता. चालुक्यराजा दुसरा जगदेकमल्ल आणि भूलोकमल्ल याचा तो मांडलिक होता. त्याने महामंडलेश्वर ही पदवी चालुक्य राजांकडून प्राफ्त करुन घेतली होती. त्याला पंचमहाशब्दांचा मान मिळाला होता. तसेच शंख, भेरी, मृदंग, श्रृंग व घंटा ही वाद्ये वाजविण्याचा सन्मान मिळाला होता. तसेच आगमन आणि गमनप्रसंगी त्याचे स्वागत डमरुग आणि तुर्य ही वाद्ये वाजवून करण्याचाही मान त्याला होता. 

टॅग्स :historyइतिहासSangliसांगली