शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

मला आव्हान देऊन सगळे दमले! : जयंत पाटील, वाळव्यातील विरोधकांच्या एकीवरून भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 13:11 IST

सांगली : ‘मला आव्हान देऊन सगळे दमले, त्यावर चर्चा नको’, अशा एका ओळीच्या प्रतिक्रियेद्वारे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने सुरू केलेल्या विरोधकांच्या एकत्रीकरणावर हल्लाबोल

ठळक मुद्दे त्यांच्या जागी राष्ट्रवादी जाऊन बसेल, याची त्यांना चिंता इतिहासातील आठवणी काढून लोकांत मतभेद निर्माण करण्याचे काम ठाकरे करीत आहेत

सांगली : ‘मला आव्हान देऊन सगळे दमले, त्यावर चर्चा नको’, अशा एका ओळीच्या प्रतिक्रियेद्वारे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने सुरू केलेल्या विरोधकांच्या एकत्रीकरणावर हल्लाबोल केला. हुतात्मा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाबद्दल अभिनंदन करताना हुतात्मा कारखाना व माझे नाते मुख्यमंत्र्यांना माहीत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.आ. पाटील महापालिका क्षेत्रातील विविध कार्यक्रमांसाठी सांगलीत सोमवारी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोनच दिवसांपूर्वी वाळवा येथील हुतात्मा साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद््घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाळव्यात आले होते. त्यांनी पाटील यांच्या विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, मला आव्हान देऊन सगळे दमले आहेत, त्यावर अधिक चर्चा नको, असे म्हणत विरोधकांच्या मोर्चेबांधणीला बेदखल केले.उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचाही आ. पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, ठाकरे सत्तेत राहून भाजपवर टीका करीत आहेत, तर त्यांचे मंत्री भाजप सरकारच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देतात. त्यांना धड सत्तेतही राहता येत नाही आणि विरोधी पक्षातही! पाठिंबा काढला तर, त्यांच्या जागी राष्ट्रवादी जाऊन बसेल, याची त्यांना चिंता आहे. जनतेचे हित जोपासण्यापेक्षा ते वेगळ्याच विवंचनेत अडकले आहेत. वसंतदादा पाटील यांनीच राज्याची सूत्रे शरद पवार यांच्या हाती दिली होती. त्यानंतर दादांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांच्यासह सर्व नेते पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. इतिहासातील आठवणी काढून लोकांत मतभेद निर्माण करण्याचे काम ठाकरे करीत आहेत. त्यांनी शिवसेना भाजपसोबत आहे की नाही, हे आधी ठरवावे. महागाईने भरडली जात असलेल्या जनतेला दिलासा देण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत; पण शिवसेनेला मात्र दिशाच सापडत नाही. सर्वात दिशाहीन पक्ष शिवसेना आहे.चांगल्या कामाला कधीच विरोध नाही : पाटीलहुतात्मा साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प रद्द केल्यावरून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली होती. त्यावर आ. जयंत पाटील म्हणाले की, हुतात्मा कारखान्याने इथेनॉलचा प्रस्ताव कधी दिला, तो कधी रद्द झाला आणि पुन्हा त्याला कधी मान्यता मिळाली, हे मला माहीत नाही. चांगल्या कामाला मी कधीच विरोध करीत नाही. मुख्यमंत्री कोणाबद्दल बोलले हे कळत नाही; पण माझ्याबद्दल नक्कीच ते बोलले नाहीत. कारण मी असे कोणतेही कृत्य केलेले नाही. शेतकºयांना चार पैसे देणाºया प्रकल्पाचे मी स्वागत करतो. ‘हुतात्मा’ व माझे नाते त्यांना माहीत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली