शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शक्तिपीठविरोधात मणेराजुरी येथे येत्या सोमवारी चक्का जाम आंदोलन, विधिमंडळावर मोर्चाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:31 IST

कवलापूर येथील बैठकीत निर्णय, बायका-मुलांसह मोर्चा काढणार

सांगली : शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्गसांगली जिल्ह्यातून रद्दच करावा यासाठी सोमवारी (दि. १६) विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मणेराजुरी (ता. तासगाव) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी केले.महामार्गासंदर्भात कवलापूर (ता. मिरज) येथे रविवारी सायंकाळी बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी घनश्याम नलावडे, शरद पवार गव्हाण, भूषण गुरव, विष्णू सावंत, गजानन सावंत, वामन कदम, शिवाजी शिंदे, राहुल जमदाडे, शेरखान पठाण, विकास मोरे, दत्तात्रय बेडगे, प्रकाश टाकले, मधुकर नलावडे, बाळासाहेब लांडगे, सोनू कुंभार, आदी शेतकरी उपस्थित होते. कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत पावसाळी अधिवेशनात बोलताना मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चेअंतीच निर्णय घेऊ, असे विधान केले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळीही शक्तिपीठ लादणार नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. पण, आता निवडणुका संपताच पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाला सांगलीपर्यंत विरोध नसल्याचा दावा केला आहे. पण, त्यांची माहिती चुकीची आहे. शक्तिपीठविरोधी लढ्याची सुरुवात सांगली जिल्ह्यातूनच झाली आहे. सध्या पूर्ण झालेल्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अत्यंत तुरळक वाहतूक असताना नव्याने समांतर महामार्गाची गरज नसल्याचे आम्ही वारंवार सांगत आहोत. महामार्गामुळे हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. नदीकाठावरील गावांवर महापुराचे संकट गडद होणार आहे. महामार्ग उंचावरून जाणार असल्याने भराव पडेल, त्यामुळे शेतामध्ये पाणी साचून कित्येक एकर शेती नापीक होणार आहे. त्याामुळे आम्ही महामार्ग होऊ देणार नाही.

बायकामुलांसह मोर्चा काढणारदिगंबर कांबळे म्हणाले, महामार्गबाधित शेतकरी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली बायका-मुलांसह विधिमंडळावर मोर्चा काढतील. तसा निर्णय कवलापूर येथील बैठकीत झाला.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन