केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:10+5:302021-03-07T04:24:10+5:30

आटपाडी : बळीराजाला उद्ध्वस्त करणारे कायदे केंद्र शासनाने केले आहेत, ...

Centre's agricultural laws destroy the farmers | केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे

केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे

आटपाडी : बळीराजाला उद्ध्वस्त करणारे कायदे केंद्र शासनाने केले आहेत, हे तिन्ही कायदे तातडीने रद्द करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. आघाडीचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सचिन मुळीक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तिन्ही कायदे तातडीने रद्द करावेत, गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे दर कमी झालेले असतानाही शासनाने मात्र देशात तेलाच्या दरात वाढ करून सर्वसामान्य लोकांना लुटण्याचे काम चालू केले आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी कपात करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी राखी खरात, शैलेंद्र ऐवळे, निखिल खरात, मिलिंद ठोकळे, नवनाथ जावीर, शिवाजी लांडगे, अमोल लांडगे, नामदेव खरात, भिकाजी खरात उपस्थित होते.

Web Title: Centre's agricultural laws destroy the farmers