शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

कडेगावच्या मोहरमची तयारी

By admin | Updated: October 18, 2015 23:47 IST

दोनशे वर्षांची परंपरा : ताबूत बांधणीस वेग; २४ पासून सोहळा

प्रताप महाडिक --कडेगाव दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम ताबूत (डोले) भेटीचा सोहळा शनिवार दि. २४ रोजी दुपारी एक वाजता होत आहे. त्यानिमित्ताने ताबूत बांधणीला वेग आला आहे. मोहरमच्यानिमित्ताने कडेगावमध्ये दीडशे ते दोनशे फूट उंचीचे ताबूत तयार केले जातात. बकरी ईदनंतर मोहरमच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची बैठक होते आणि त्यानंतर महिन्याभरातच ताबुताची बांधणी होते. अष्टकोनी आकाराचे मजले तयार करून त्याला लाल, हिरवा कागद व बेगड लावून हुंड्या, झुंबर, नारळाच्या तोरणाने ताबूत सुशोभित करून, एकावर एक मजले तयार केले जातात. ही बांधणी करताना कुठेच गाठ दिली जात नाही. या मोहरमच्या निमित्ताने १४ ताबूत बसविले जातात. यापैकी निम्मे ताबूत हे हिंदूंचे असतात. ताबूत भेटीनंतर तिसऱ्या दिवशी (जियारत) होऊन मोहरमची सांगता होते. अशा या ताबुतांची बांधणी हिंदू-मुस्लिम बांधव खांद्याला खांदा लावून करतात आणि ताबूत उचलण्याचा पहिला मानही हिंदूंनाच दिला जातो. म्हणूनच देशमुख, कुलकर्णी, देशपांडे, शेटे, शिंदे, सुतार, वाळिंबे यांना हा मान दिला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने देशभर सामाजिक ताण-तणाव निर्माण होत असताना कडेगावमध्ये मात्र हिंदू-मुस्लिम बांधव सामाजिक सलोख्याचा आदर्श साऱ्या समाजासमोर घालून देत आहेत. मोहरमच्या सणासाठी संपूर्ण राज्यभरातून भाविक येत असतात. यानिमित्ताने तयारीला वेग आला आहे. ऐक्याचा संदेश मोहरमची सुरूवातच चंद्रदर्शनाने होते. चंद्रदर्शनानंतर कुदळ मारली जाते. मोहरमला तारीख ५ रोजी सर्वजण मशिदीत जाऊन हजरत इमाम हुसेनच्या नावाने हातात अट्टी दोरा बांधून फकीर होतात. कुदळ मारल्यानंतर दहा दिवस मांसाहार वर्ज्य केला जातो. ९ रोजी मोहरम उभे केले जातात व १0 रोजी ताबुतांच्या मिरवणुका व भेटीचा सोहळा साजरा होतो. ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा अब एकी का कर कर दो पुकारा, हिंदू-मुस्लिम ऐक्य रहेंगे एकी से सागर पार क रेंगे, अब एकी का ले लो सहारा’ असा ऐक्याच्या गीतातून एकतेचा संदेश दिला जातो.हिंदू-मुस्लिम सलोखाथोर संत साहेब हुसेन पीरजादे हिंदू-मुस्लिम ऐक्य घडविण्यासाठी त्यांनी मोहरममधील काव्यरचना केल्या. त्यांनी मुस्लिम धर्माबरोबर हिंदू धर्मावर आधारित काव्य लिहिले. मोहरमचा मान हिंदूंकडे, तर दसरा सणातील आपटा पूजन, होळी पेटवणे, रंगपंचमीचा मान मुस्लिम बांधवांक डे आहे. असे हे सामाजिक सलोख्याचे चित्र येथे दिसते.