आरळा येथील पोलीस पाटलावर बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:52+5:302021-09-23T04:30:52+5:30

कोकरूड : शिराळा तालुक्यातील एका गावात महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरळा पैकी भाडुगळेवाडी (ता. शिराळा) ...

A case of rape against a police patrol in Arla | आरळा येथील पोलीस पाटलावर बलात्काराचा गुन्हा

आरळा येथील पोलीस पाटलावर बलात्काराचा गुन्हा

googlenewsNext

कोकरूड : शिराळा तालुक्यातील एका गावात महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरळा पैकी भाडुगळेवाडी (ता. शिराळा) येथील पोलीस पाटील सुनील महादेव कदम (वय २५) याच्याविरोधात पीडित महिलेने कोकरूड पोलीस दिली आहे.

सुनील कदम हा पोलीस पाटील असून पदाचा गैरफायदा घेत तो पीडित महिलेस सप्टेंबर २०२० पासून वारंवार त्रास देत होता. या महिलेच्या मोबाईलवर अशील मेसेज व फोटो पाठवून शारीरिक सुखाची मागणी करत होता. महिलेचा पती नोकरीनिमित्त मुंबई येथे असून सासू, सासरे वयोवृद्ध आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत सुनील कदमने पीडित महिलेवर घरी कोणी नसताना वारंवार बलात्कार केला. तसेच कोणास सांगितल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती.

अखेर हा सर्व प्रकार असह्य झाल्याने महिलेने बुधवारी कोकरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून सुनील कदमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पाटील करीत आहेत.

Web Title: A case of rape against a police patrol in Arla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.