शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: सकाळी पदयात्रा, दुपारी बैठका आणि रात्री कोपरासभा; प्रचाराचे रान तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:03 IST

भाडोत्री प्रचारकांना भाव

सांगली : महापालिका निवडणुकीचे रणमैदान तापू लागले असून प्रभागातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे. सकाळी पदयात्रेद्वारे घरोघरी संपर्क, दुपारी गल्ली निहाय बैठका आणि रात्री कोपरा सभा असे हाऊसफुल्ल वेळापत्रक तयार केले आहे.प्रचारासाठी १२ दिवसांचा अवधी हाती असल्याने उमेदवारांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची तिकिटे लवकर निश्चित झाल्याने त्यांनी आपला प्रभाग पिंजून काढला आहे. तिकिटासाठी रस्सीखेच झालेल्या ठिकाणी मात्र उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचण्यात धावपळ करावी लागत असल्याचे दिसत आहे. यंदा प्रभाग रचनेत फारसा बदल झालेला नाही. मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये जोडून असणाऱ्या प्रभागात मात्र बदल झाले आहेत. त्यामुळे तेथील नव्या मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका मांडण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. विस्तारित भागातील प्रभागांमध्ये चारही उमेदवारांनी प्रचाराचे स्वतंत्र नियोजन केले आहे. थोड्या-थोड्या वस्त्या वाटून घेतल्या आहेत.सकाळी नऊ-दहा वाजता पदयात्रेसाठी बाहेर पडल्यानंतर घरी परतण्यास एक-दोन वाजून जातात. त्यानंतर काही ठिकाणी गठ्ठा मतदानाच्या बैठका होतात. दुपारनंतर पुन्हा पदयात्रा आणि रात्री मुख्य चौकात कोपरासभा घेतल्या जात आहेत. पदयात्रेमध्ये अग्रभागी हलगीवाले आणि उमेदवारांची छबी झळकविणारे डिजिटल पोस्टर्स घेतलेले कार्यकर्ते असे पदयात्रेचे सर्रास दिसणारे चित्र आहे.

भाडोत्री प्रचारकांना भावसांगली-मिरजेतील काही चौकात आजूबाजूच्या गावांतून दररोज सकाळी रोजगारासाठी मोठ्या संख्येने कामगार वर्ग डबे घेऊनच येतो. चौकात थांबून रोजगाराची प्रतीक्षा करतो. काम मिळाले, तर सायंकाळी पगार घेऊनच घरी परततो. या मजूरवर्गाला निवडणुकीत रोजगार मिळाला असून त्यांना सध्या भावही चांगला आहे. पदयात्रांमध्ये असे भाडोत्री मजुरांचे चेहरे अनेक ठिकाणी दिसत आहेत.विस्तारित भागातील प्रचार डोकेदुखीसांगली, मिरज व कुपवाड शहरांच्या विस्तारित भागातील प्रचार म्हणजे उमेदवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. बहुतांश मतदार दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असल्याने घरांना कुलुपे असतात. तुरळक वस्ती असल्याने तेथे कोपरासभा ही घेता येत नाहीत. अनेक प्रभागांत शेत वस्त्यांचा समावेश आहे. तेथील मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना घाम फुटत आहे.कृष्णाघाटवाले म्हणतात,‘आम्हाला ग्रामपंचायत द्या’मिरजेतील कृष्णाघाटचे रहिवासी विकासकामे होत नसल्याने वैतागले आहेत. ‘आम्हाला महापालिका किंवा नगरपालिका नको, स्वतंत्र ग्रामपंचायतच द्या’ अशी मागणी केली आहे. त्यासाठी तीन दिवसांपूर्वी रहिवाशांनी व्यापक बैठकही घेतली. येथील रहिवासी आक्रमक झाल्याने उमेदवारांना मते मागण्यासाठी जाणे आव्हान ठरले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election 2026: Candidates intensify campaign with rallies and meetings.

Web Summary : Sangli's municipal election heats up as candidates focus on voter outreach. They are holding rallies, meetings, and corner gatherings. Voters in expanded areas present a challenge due to work schedules. Frustrated Krishna Ghat residents demand a separate Gram Panchayat.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६