शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंजीसाठी आले आणि भारतातच अडकले ; सांगलीतील कुटुंबाची कोरोनाने केली ताटातूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:04 IST

पती, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे चौकोनी कुटुंब सहा वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहते. पतीच्या नोकरीमुळे सारेच हाँगकाँगवासी झालेत. ते राहत असलेले शहर चीनच्या अगदी सीमेलगत आहे. त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत उभे राहिले तरी चीनच्या शेनझेन शहरातील इमारती दिसतात.

ठळक मुद्देप्रतीक्षा कोरोनाची साथ ओसरण्याची

सांगली : मुलाच्या मुंजीसाठी हाँगकाँगहून आलेले एक कुटुंब कोरोनामुळे भारतातच अडकून पडले. कुटुंबप्रमुख परतले, पण पत्नी आणि मुले कोरोनाची साथ ओसरण्याची वाट पाहत आहेत.

पती, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे चौकोनी कुटुंब सहा वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहते. पतीच्या नोकरीमुळे सारेच हाँगकाँगवासी झालेत. ते राहत असलेले शहर चीनच्या अगदी सीमेलगत आहे. त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत उभे राहिले तरी चीनच्या शेनझेन शहरातील इमारती दिसतात. डिसेंबर महिन्यात मुलाच्या मुंजीसाठी सारे भारतात आले. जानेवारीअखेरीस मुंजीचा सोहळा साग्रसंगीत पार पडला. २२ फेब्रुवारीपर्यंत सर्वजण एकत्र थांबले. एवढ्यात जगभर कोरोनाने हात-पाय पसरायला सुरुवात केली. ड्युटीवर हजर होणे गरजेचे असल्याने कुटुंबप्रमुख निघून गेले व पत्नी आणि दोन मुले मात्र येथेच राहिली.

२० एप्रिलपासून हाँगकाँगमध्ये मुलांची शाळा सुरू होतेय. त्याअनुषंगाने १० एप्रिलचे विमानाचे तिकीट आरक्षित केले आहे. पण कोरोनाची स्थिती कशी राहते, यावर विमान उड्डाण अवलंबून आहे. २२ मार्चपासून भारताने सर्वच आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर निर्बंध घातले आहेत. परिस्थिती सावरली नाही, तर ती लांबू शकतात. हाँगकाँगमध्येही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काटेकोर नियम लागू केलेले असल्याने, तेथील प्रवेशही तितकासा सुकर राहिलेला नाही. शाळा-महाविद्यालये, बगीचे बंद आहेत. वर्क फ्रॉम होमची तंतोतंत अंमलबजावणी सुरु आहे. अशा स्थितीत भारतातच तूर्त सुरक्षित असल्याची या कुटुंबाची भावना आहे.भारतातही हाँगकाँगसारखीच परिस्थितीची हाताळणीसहा वर्षांपासून हाँगकाँँगमध्ये राहिल्याने तेथील प्रशासकीय व्यवस्था जवळून पाहिलेल्या या कुटुंबाने भारतातील कोरोना युद्धाचेही कौतुक केले. देशात कोरोनासंदर्भात गतीने निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी केली गेली. त्यामुळे सव्वा अब्ज लोकसंख्येच्या देशातही कोरोनाने हाहाकार माजला नाही. लोकांनाही त्याचे गांभीर्य समजले आहे. हाँगकाँगच्या धर्तीवरच भारतानेही कोरोनाविरोधात मोहीम राबविल्याचे निरीक्षण या कुटुंबाने नोंदविले. 

 

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस