शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या पोर्टलवर ‘बिझनेस प्रमोशन’ टॅब; उत्पादन-सेवांची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:20 IST

लाभार्थ्यांच्या व्यवसायाला नवे बळ 

प्रसाद माळीसांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी व त्यांच्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्यासाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरती बिझनेस प्रमोशन हा नवा स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिला आहे. या नव्या टॅबच्या माध्यमातून लाभार्थी व्यावसायिक, उद्योजक त्यांचे सेवा, उत्पादने त्यांची किंमत, तसेच वैशिष्ट्य यांसह व्यवसायाशी संबंधित सविस्तर माहिती पोर्टलवर अपलोड करू शकणार आहेत. याद्वारे लाभार्थ्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धीसह ग्राहकांपर्यंत पोहचणे सुलभ होणार आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अधिकृत www.udyog.mahaswayam.gov.in या पोर्टलवर Business Promotion (व्यवसाय वृद्धी) हा स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाला व्यापक प्रचार व प्रसिद्धी मिळणार असून, त्यांची उत्पादने व सेवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास चालना मिळेल, स्थानिक उत्पादने व सेवा ग्राहकांना सहज उपलब्ध होतील, तसेच महामंडळाच्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना राज्य शासन उद्योग, व्यवसायासाठी अर्थसाहाय्य करते. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून बँकांकडून कर्ज उपलब्ध केले जाते. योजनेचे लाभार्थी बँकेला मंजूर कर्ज व त्याचे व्याज हप्ते स्वरूपात भरतात. त्यानंतर लाभार्थी महामंडळाकडे भरलेल्या व्याजेच्या रकमेची मागणी करतात. मागणीनंतर संबंधित लाभार्थी जितके व्याज बँकेत भरतात तितक्या व्याजाचा परतावा महामंडळाकडून त्यांना अनुदान स्वरूपात परत केला जातो. या योजनेच्या माध्यमातून हजारो तरुण आज सक्षम झाले आहेत.

महामंडळाने फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०२४ या सात वर्षांत केलेले अर्थसाहाय्य

  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
  • एकूण बॅंक कर्ज मंजूर लाभार्थी : ९६९७
  • बँकेने वितरित केलेले एकूण कर्ज रक्कम : ९७१ कोटी १२ लाख २० हजार ८८९
  • व्याज परतावा मंजूर झालेली लाभार्थी संख्या : ९४८२
  • व्याज परतावा मिळालेली लाभार्थी संख्या : ८८८५
  • महामंडळाने केलेला व्याज परतावा : १०६ कोटी ४७ लाख ५३ हजार ८५६
  • २. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना
  • अर्ज केलेल्या गटाची संख्या : ४३६
  • एकूण बॅंक कर्ज मंजूर लाभार्थी गटांची संख्या : २३४
  • व्याज परतावा मिळालेली लाभार्थी गट संख्या : २१८
  • महामंडळाने केलेला व्याज परतावा : ७ कोटी ३० लाख

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सर्व संबंधित लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली आवश्यक माहिती तत्काळ पोर्टलवर अपलोड करावी. याबाबत कोणतीही अडचण अथवा मार्गदर्शनासाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. - निशा पाटील, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील महामंडळ.

English
हिंदी सारांश
Web Title : Annasaheb Patil Corporation's portal: Business promotion tab for entrepreneurs.

Web Summary : Annasaheb Patil Corporation launches 'Business Promotion' tab on its website. Beneficiaries can now upload details of their services and products, reaching a wider customer base and boosting business growth. The corporation provides financial assistance to economically weaker sections of the Maratha community through various schemes.