सांगली : रेडमध्ये घरफोडी; सहा लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 14:30 IST2019-01-07T14:27:48+5:302019-01-07T14:30:53+5:30

रेड ( ता.शिराळा) येथील शिक्षक आनंदराव राजाराम पाटील यांचे भरचौकातील घर फोडून १३ तोळे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रुपयांची रोकड असा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सोमवार पहाटे ही घटना उघडकीस आली. याबाबत शिराळा पोलीसली ठाण्यात नोंद झाली आहे.

Burglary in Red; Lakhs of six lakhs | सांगली : रेडमध्ये घरफोडी; सहा लाखाचा ऐवज लंपास

सांगली : रेडमध्ये घरफोडी; सहा लाखाचा ऐवज लंपास

ठळक मुद्देरेडमध्ये घरफोडी; सहा लाखाचा ऐवज लंपासशिराळा पोलीस ठाण्यात नोंद

शिराळा : रेड ( ता.शिराळा) येथील शिक्षक आनंदराव राजाराम पाटील यांचे भरचौकातील घर फोडून १३ तोळे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रुपयांची रोकड असा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सोमवार पहाटे ही घटना उघडकीस आली. याबाबत शिराळा पोलीस  ठाण्यात नोंद झाली आहे.


आनंदराव पाटील घरगुती अडचण व वडिलांच्या आजारपणामुळे कुटुंबासह इस्लामपूर येथे राहावयास आहेत. आज सोमवार सकाळी आनंदराव यांचे वाटेकरी शेतातील वाटेकरी कुसुम पाटील आनंदराव यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.

घराच्या मुख्य दरवाज्याचे तसेच आतील चार दरवाज्याची  कुलूपे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. लोखंडी तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून त्यातील औषधोपचारा साठी आणलेले दोन लाख रुपये तसेच आनंदराव यांच्या मृत आई लक्ष्मी यांच्या सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, वज्र टिक, कोल्हापुरी डोरले आदी अंदाजे सात तोळ्याचे तसेच पत्नी मनीषा यांच्या पाटल्या , बांगड्या , कानातील झुमके, लहान मंगळसूत्र आदी अंदाजे सहा तोळे अशे सर्व मिळून तेरा तोळे सोन्याचे दागिने या अज्ञात चोरून नेले आहेत.



 चोरट्यानी तिजोरी तील सर्व साहित्य विस्कटून टाकले आहे. तेथील खुर्चीत बसून सर्व दागिन्यांचे बॉक्स मधील दागिने काढून घेऊन मोकळे बॉक्स तेथेच टाकले आहेत.त्याच बरोबर दुसऱ्या खोलीतील साहित्य ही चोरट्याने विस्कटलेले आहे.

Web Title: Burglary in Red; Lakhs of six lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.