बुधगावला घरफोडी; ६३ हजाराचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:18 IST2019-06-05T12:14:24+5:302019-06-05T12:18:45+5:30

बुधगाव (ता. मिरज) येथे चोरट्याने घर फोडून ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत राहुल महादेव बेंद्रे (वय २७, रा. लक्ष्मीनगर, बुधगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Bundabaghau burglary; 63 thousand dollars lumpas | बुधगावला घरफोडी; ६३ हजाराचा ऐवज लंपास

बुधगावला घरफोडी; ६३ हजाराचा ऐवज लंपास

ठळक मुद्देबुधगावला घरफोडी; ६३ हजाराचा ऐवज लंपासघटनास्थळाचा पंचनामा, चोरट्याचा शोध सुरू

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे चोरट्याने घर फोडून ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत राहुल महादेव बेंद्रे (वय २७, रा. लक्ष्मीनगर, बुधगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

बेंद्रे यांचे घर बंद असल्याचे पाहून रविवारी रात्रीच्या सुमारास चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन हजाराची रोकड व सोन्याचे दागिने असा ६३ हजाराचा ऐवज लंपास केला. सोमवारी चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर बेंद्रे यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Bundabaghau burglary; 63 thousand dollars lumpas