शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
2
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
3
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
4
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
5
"मी सनातन धर्माचा…"; गीता पठणासंदर्भात हुमायूं कबीर यांचं वक्तव्य, केली मोठी घोषणा!
6
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
8
कोकणात मोठा प्रतिसाद, मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची करा; प्रवाशांची मागणी पूर्ण कधी होईल?
9
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
10
पाकिस्तानचे पुन्हा तुकडे होणार? मंत्र्याच्या वक्तव्याने नवा वाद, तज्ञांनी व्यक्त केली चिंता...
11
"एक-दोन नाही, हजारो कपल्सच्या रोमान्सचे व्हिडीओ रेकॉर्ड"; आरोपीचा खळबळजनक खुलासा
12
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
13
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
14
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
15
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
16
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
17
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
18
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
19
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
20
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बोगस धनादेशप्रकरणी कवलापूरच्या दलालास सहा महिने सक्तमजुरी, आठ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:06 IST

शेतकऱ्यास डाळिंब खरेदीपोटी बोगस धनादेश देऊन केली फसवणूक

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील शेतकऱ्यास डाळिंब खरेदीपोटी बोगस धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दलाल महेश पांडुरंग पाटील (रा. कवलापूर) याला ६ महिने सक्तमजुरी व ८ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए. आर. कल्हापुरे यांनी हा निकाल दिला.कवलापूर येथील शेतकरी बाबासाहेब आनंदराव जाधव (रा. कवलापूर) यांची डाळिंबाची बाग आहे. गावातीलच महेश पाटील हा दलाल आहे. शेतकऱ्यांकडून डाळिंब खरेदी करून तो परराज्यातील कंपनी व मोठ्या व्यापाऱ्यांना पाठवण्याचा व्यवसाय असल्याचे महेश सांगत होता.महेश पाटील याने २०१४ मध्ये जाधव यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख ८० हजार ८०४ रुपयांचे डाळिंब खरेदी केले होते.यापोटी त्याने जाधव यांना १ लाख ७० हजार रुपये रोख दिले. तर उर्वरित रकमेसाठी आयसीआयसीआय बँकेचे दोन धनादेश दिले. यापैकी एका धनादेशावर २ लाख रुपये, तर दुसऱ्या धनादेशावर २ लाख ४२४ रुपये, अशी रक्कम नमूद होती. जाधव यांनी दोन्ही धनादेश त्यांच्या बँक खात्यावर जमा केले. धनादेश वटण्यासाठी गेल्यानंतर दलाल पाटीलच्या खात्यावर पुरेशी रक्कम नाही तसेच खाते सील आहे, असा शेरा मारलेले धनादेश जाधव यांच्याकडे परत आले.धनादेश न वटता फसवणूक केल्याबद्दल जाधव यांनी ॲड. नरेश पाटील व ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा यांच्यामार्फत सांगलीतीलन्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. चौकशीत दलाल पाटील यास दोषी ठरवत सहा महिने सक्तमजुरी व ८ लाख रुपयांचा दंड सुनावला. दंडाच्या रकमेपैकी ४ लाख ४२४ रुपये फिर्यादी जाधव यांना देण्याचे व अपील मुदत संपल्यानंतर उर्वरित ४ लाख रुपये सरकारला जमा करण्याचे आदेश दिले.