शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनावर पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार

By admin | Updated: December 22, 2016 23:51 IST

जिल्हा परिषद : पत्रिकेवर आर. आर. पाटील यांचे छायाचित्र नसल्यावरून सदस्य आक्रमक

सांगली : जिल्हा परिषदेच्यावतीने जत येथे भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव दिले असताना, पत्रिकेवर मात्र त्यांचे छायाचित्र नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. सर्वसाधारण सभेतही राष्ट्रवादीसह सर्व सदस्यांनीही आक्रमक भूमिका घेत, प्रदर्शनासाठी मंजूर झालेला निधी रोखण्यास भाग पाडले. जिल्हा परिषदेच्यावतीने जत येथे गुरुवारपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सुरू झाले. दिवंगत आर. आर. पाटील यांच्या नावाने हे प्रदर्शन होत असतानाही, प्रदर्शन कार्यक्रमाच्या पत्रिकेवर पाटील यांचे छायाचित्र नव्हते. शिवाय त्यांचे नावही लहान अक्षरात छापले होते. त्यामुळे अध्यक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर बुधवारी पत्रिका बदलण्यात आली होती; परंतु बदललेल्या पत्रिका वाटण्यातच आल्या नव्हत्या. याचे पडसाद गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. सभेच्या अगोदर झालेल्या राष्ट्रवादीच्या पक्षबैठकीमध्येही यावर जोरदार चर्चा झाली. यामागे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले मात्र भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक असलेले कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती संजीवकुमार सावंत हेच यामागे असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.सभेच्या सुरुवातीलाच, ज्यांच्या नावाने प्रदर्शन भरविण्यात आले आहे, त्यांचेच छायाचित्र पत्रिकेवर नसल्याने प्रदर्शनास स्वीय निधीतून रक्कम देण्यात येऊ नये, अशी भूमिका सदस्यांनी मांडली. पत्रिकेवर पाटील यांचे छायाचित्र तर नाहीच, शिवाय कोणालाही विश्वासात न घेता प्रदर्शन भरविण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला. जत येथे होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास कोणीही न जाता बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील यांनी सभागृहातील सर्वांना उद्देशून बदललेली पत्रिका मिळाली आहे का, असा सवाल केला. त्यावर पत्रिका मिळाली नसल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी सर्वसाधारण सभा असल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊ नये, असे कृषी सभापतींना सांगितले होते. मात्र, त्यांनी ऐकले नाही. पत्रिकेबाबत कोणालाही कल्पना देण्यात आली नव्हती, असे अध्यक्षा पाटील यांनी सांगितले. सुरेश मोहिते, सम्राट महाडिक, राजेंद्र माळी, प्रकाश देसाई, सूर्यकांत मोटेकर यांनीही या विषयावर आक्रमकपणे म्हणणे मांडले. (प्रतिनिधी)कृषी सभापतींची दिलगिरीकृषी प्रदर्शनाच्या आयोजनामुळे सभेत कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती संजीवकुमार सावंत गैरहजर होते. सभेत जतच्या प्रदर्शनावरून गदारोळ झाल्याची माहिती मिळताच सावंत यांनी उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्याशी संपर्क साधला. प्रदर्शनस्थळी आर. आर. आबांचे मोठे छायाचित्र लावण्यात आले असून, सदस्यांना पत्रिका मिळण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. मात्र, यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. ही गंभीर बाब असून, चुकीला माफी नाही, असे म्हणत सदस्यांनी निधी रोखण्याचा निर्णय कायम ठेवला. सावंत यांचा राजीनामा घ्या जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून प्रदर्शन आयोजित करण्यात आले असतानाही सदस्यांना विचारात न घेता ते भरविण्यात आले. ज्यांच्या नावाने प्रदर्शन भरविण्यात आले, त्यांचे छायाचित्रही वापरण्यात आले नाही. ही बाब गंभीर असून, सभापती संजीवकुमार सावंत यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचा आरोप करत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी सम्राट महाडिक यांनी केली. खास बाब म्हणून प्रदर्शनाला निधी : सदाभाऊदरम्यान, जत येथील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेने निधी रोखल्याप्रकरणी खोत उद्घाटन समारंभात म्हणाले की, जिल्हा परिषदेमधील पदाधिकाऱ्यांना जतच्या कृषी प्रदर्शनात मानसन्मान मिळाला नाही, म्हणून प्रदर्शनाचा सहा लाखांचा निधी अडविण्याचा निर्णय घेऊन त्यांनी करंटेपणा दाखविला आहे. राज्यात आमची सत्ता आहे. कृषिमंत्री मी आहे. खास बाब म्हणून आम्ही प्रदर्शनाला निधी देणार आहोत. जिल्हा परिषदेला निधी आम्ही देतो. मागील सत्ताधाऱ्यांनी कृषी विभागात केलेल्या गैरव्यवहाराची फाईल आमच्याकडे आली आहे. त्याची योग्य चौकशी होईल.सांगलीत स्वतंत्र प्रदर्शन : जत येथील कृषी प्रदर्शनास स्वीय निधीतून रक्कम न देता आर. आर. आबांच्या नावाने सांगलीत स्वतंत्र प्रदर्शन भरविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. कृषी सभापतींनी सदस्यांनाच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात न घेता प्रदर्शन भरविले आहे. त्यामुळे जत येथील प्रदर्शनाचा निधी रोखून सांगलीत प्रदर्शन घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.