शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सेंटरमधून पळालेले दोन्ही गुन्हेगार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 16:24 IST

covidcenter, sangli, jail, criminals, arrest कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधून पलायन केलेल्या दोन गुन्हेगारांनी अटक करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले.

ठळक मुद्देकोरोना सेंटरमधून पळालेले दोन्ही गुन्हेगार जेरबंद, सांगली पोलिसांची कारवाई एका कऱ्हाडमधून अटक, चारचाकी वाहन चोरले

सांगली : कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधून पलायन केलेल्या दोन गुन्हेगारांनी अटक करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. गेली दहा दिवस दोन्ही गुन्हेगार पसार होते. कोरोना सेंटरमधून पळून गेल्यानंतर या दोघांनी शहरात एक चारचाकी मोटार चोरल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.राजा ऊर्फ राजू नागेश कोळी (वय २०, हरीपूर काळीवाट, सांगली), नाग्या ऊर्फ नागेश ऊर्फ रोहित बाळू जगदाळे (१९, पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) अशी दोन्ही गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांनी साथीदारांसह २३ आॅगस्ट रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास कोल्हापूर रस्ता परिसरात थांबलेल्या ट्रक चालकाला लुटले होते.

शहर पोलिसांनी १७ सप्टेंबर रोजी दोघांनाही अटक केली व त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. कारागृहात नेण्यापूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना कारागृहातील कैद्यांसाठी कॉलेज कॉर्नर येथे उभारलेल्या एका वसतिगृहातील अलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले होते.

रविवार २७ सप्टेंबर रोजी पहाटे खिडकीच्या काचा काढून, दोन गजांमधून ते बाहेर आले व मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतीवरून उड्या मारून त्यांनी पलायन केले. याप्रकरणी गार्ड ड्युटीवर असणाऱ्या चार पोलिसांची तातडीने बदली करण्यात आली होती.या गुन्हेगारांच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली होती. दोन्ही गुन्हेगारांना कोरोना सेंटरमधून पलायन केल्यानंतर सांगलीतून एक चारचाकी वाहनही चोरले होते. त्यातून ते पसार झाले होते. यापैकी राजू कोळी हा कऱ्हाडमध्ये असल्याची माहिती मिळताच एलसीबीचे उपनिरीक्षक प्रविण शिंदे, बिरोबा नरळे, संतोष गळवे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांना रोहित जगदाळे हा शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने जगदाळे याला ताब्यात घेतले. या दोघांनाही विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjailतुरुंगSangliसांगली