शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सुट्टीवर आलेल्या बुर्लीच्या जवानाचा अपघातामध्ये मृत्यू, अंत्यदर्शनासाठी पत्नीला स्ट्रेचरवरून आणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:42 IST

शासकीय इतमामात दफन : बंदुकीच्या फैरी झाडून ‘बीएसएफ’ची मानवंदना

पलूस : बुर्ली (ता. पलूस) येथील सीमा सुरक्षा दलाचे मुख्य जवान रियाज ऊर्फ अमर मिरासो इनामदार (वय ४६) सध्या रा. विजापूर एडगे पेट्रोल पंपाजवळ, मूळ गाव बुर्ली, ता. पलूस यांचे अपघाती निधन झाले. इनामदार यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिवाचे शासकीय इतमामात व बंदुकीच्या फैरी झाडून दफन करण्यात आले. मुजावर हे १५ दिवसांच्या सुट्टीवर आले होते. ते सुट्टीनिमित्त विजापूरहून बुर्लीस परत येत असताना अथणीजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एस. टी. बसला चारचाकीची धडक बसून रियाज इनामदार यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. २० रोजी दुपारी १:३० च्या दरम्यान घडली. त्यांच्यासोबत असणारी त्यांची पत्नी सानिया इनामदार (वय ४१) व मुलगा शाहीद इनामदार (१५) हे दोघे जखमी झाले आहेत.याबाबत माहिती अशी, रियाज इनामदार हे बीएसएफ सीमासुरक्षा दलात त्रिपुरा येथे देशसेवेत कार्यरत होते. त्यांनी तब्बल २६ वर्षे देशसेवा केली आहे. त्यांचे मूळ गाव हे बुर्ली असून ते विजापूर येथे सासरवाडीत स्थायिक झाले होते. सध्या १५ दिवसांच्या सुट्टीवर विजापूरला आले होते. स्वत:च्या चारचाकीतून पत्नी व मुलगा तिघे बुर्लीकडे कुटुंबास भेटण्यासाठी येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघातात चारचाकीचा चक्काचूर झाला. पत्नी सानिया या गंभीर जखमी असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर मिरज येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पलूस तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. रियाज यांच्या मृत्यूने संपूर्ण पलूस तालुका व बुर्ली गावावर शोककळा पसरली. बुर्लीतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. गावच्या प्रमुख मार्गावरून रियाज यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत जवान ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील भाऊ, भावजयी असा परिवार आहे.पत्नीला अंत्यदर्शनासाठी स्ट्रेचरवरून आणलेपत्नी सानिया यांना अंत्यदर्शनासाठी स्ट्रेचरवरून आणण्यात आले. दोन्ही घटना पाहून गावातील महिलांना अश्रू अनावर झाले होते. रियाज व पत्नी यांना पाहून नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू