शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मिशीला कट न मारल्याने सलून दुकानदारावर ब्लेडने वार, संशयित तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 18:48 IST

‘थोडा वेळ थांब. एक गिऱ्हाईक करतो’ म्हटल्याने रागावलेल्या सोहेलने दगड मारून दुकानात खुर्चीच्या मागे लावलेला आरसा फोडला. याची विचारणा केल्यानंतर जाधव यांना ‘तू माझ्या मिशीला कट का मारला नाहीस’, असे म्हणत सोहेलने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण केली.

मिरज : मिरजेत खाजा बस्ती येथे सलून दुकानात मिशीला कट मारला नसल्याच्या कारणावरून तरुणाने सलून दुकानदारावर ब्लेडने वार केले. यावेळी सलून दुकानातील काच दगडाने फोडून नुकसान करण्यात आले.खाजा वसाहतीत शंभरफुटी रस्त्यावर चॉईस हेअर कटिंग या सलून दुकानात मिशी कट करण्यासाठी गेलेल्या चुआ ऊर्फ सोहेल सोलकर या तरुणाने सलून व्यावसायिक अर्जुन गाविंद जाधव याच्यावर ब्लेडने वार करून दगडाने मारहाण केली.अर्जुन जाधव (रा. गुरुवारपेठ मिरज) यांचे खाजा वसाहतीत सलून दुकान आहे. या दुकानात सोहेल ऊर्फ चुआ निजाम सोलकर गेला होता. सोहेल याने त्याच्या मिशीला कट मारण्यास अर्जुन जाधव याना सांगितले. अर्जुन जाधव यांनी ‘थोडा वेळ थांब. एक गिऱ्हाईक करतो’, असे सांगितले. यामुळे रागावलेल्या सोहेलने दगड मारून दुकानात खुर्चीच्या मागे लावलेला आरसा फोडला.याची विचारणा केल्यानंतर जाधव यांना ‘तू माझ्या मिशीला कट का मारला नाहीस’, असे म्हणत सोहेलने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण केली. हातातील ब्लेडने जाधव यांच्या हातावर वार करून डाव्या हाताचा चावा घेतला. यावेळी पळून जाताना बाहेर पडलेला दगड जाधव यांच्याकडे फेकल्याने दगड हाताला लागल्याची तक्रार त्यांनी गांधी चौक पोलिसात दिली आहे. याबाबत सोहेल सोलकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस