शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचे धोरण - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 13:58 IST

शिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या.

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त देशाचा जसा नारा दिला, त्याचपद्धतीने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे आमचे धोरण आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षाबाबत वेगळी भूमिका मांडली असली तरी आमच्या पक्षात विरोधाभास नाही, असे मत भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, आम्ही केवळ मोदींच्या धोरणानुसार चालत आहोत. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ भाजपचेच अस्तित्व दिसेल, यासाठी काम करायचे आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. याठिकाणी पक्ष मजबूत आहेच, मात्र ज्याठिकाणी काही कमतरता जाणवेल त्याठिकाणी आवश्यकतेनुसार राजकीय व्हिटॅमिन देण्याचा प्रयत्न आम्ही करु. गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले. त्याचपद्धतीचे राजकारण मला करायचे आहे. या दोन्ही जिल्ह्यांत त्यांनी जोडलेली असंख्य माणसे असल्याने मला याठिकाणी चांगले काम करता येईल.महाराष्ट्रातील कारभार सध्या अत्यंत वाईट पद्धतीने सुरु आहे. मंत्रिमंडळातील अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यामुळे कारवाई झाल्यानंतरही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत. त्यामुळे लोकांच्या मनात या सरकारविषयी शंका आहे.न्यायालयांचे आदेश सूर्यप्रकाशासारखेईडीसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. या यंत्रणांच्या कारवाईविरोधात अनेकजण न्यायालयात गेले आहेत. न्यायालयांचे निकाल तर सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहेत, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.‘म्हैसाळ’ भ्रूणहत्येवर आवाज उठविणारमुंडे म्हणाल्या की, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे पाच वर्षांपूर्वी भ्रूणहत्येचे रॅकेट उघडकीस आले होते. पाच वर्षानंतरही विशेष सरकारी वकील का नियुक्त झाला नाही, याची चौकशी करून आवाज उठवू. पुण्यातील किडनी रॅकेटबाबतही भाजप विधानसभेत आवाज उठवेल.ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आघाडी सरकारमुळेराज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे निर्माण झाला आहे. न्यायालयात ओबीसींना न्याय मिळावा म्हणून मी देवाला साकडे घालते, असे मुंडे यांनी सांगितले.नाईकांबद्दल आदरचशिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेcongressकाँग्रेस