लोकहित सोडून शिवसेनेची सत्तेसाठी भाजपशी युती - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:33 PM2019-02-20T22:33:38+5:302019-02-20T22:34:00+5:30

शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे.

BJP's alliance with Shiv Sena's power except for publicity - Jayant Patil | लोकहित सोडून शिवसेनेची सत्तेसाठी भाजपशी युती - जयंत पाटील

लोकहित सोडून शिवसेनेची सत्तेसाठी भाजपशी युती - जयंत पाटील

Next
ठळक मुद्देभाजपवरील टीका सेनाप्रमुख विसरले का?

इस्लामपूर : शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे.
आ. पाटील हे अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीत भारतीय प्रश्नावर व्याख्यान देण्यासाठी गेले आहेत. तेथून त्यांनी हे ट्विट करीत शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.

आ. पाटील म्हणाले, शिवसेनेने गेल्या चार वर्षात मोदी सरकार व भाजपवर जहरी टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दै. सामनाच्या संपादकीयमधून मोदी सरकार व भाजपची लक्तरे काढली आहेत. शिवसेनेने मोदी सरकारची ‘जुलमी ब्रिटिश राजवटी’शी तुलना करून या सरकारला झोपाळू ‘कुंभकर्ण’ अशी उपमा दिली आहे. प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत ‘चौकीदार चोर है’ अशी टीका करण्यापर्यंत मजल मारल्याचे राज्यातील, देशातील जनतेने पाहिले, ऐकले आहे.

युती गेली खड्ड्यात. आधी शेतकºयांच्या कर्जमाफीचे बोला, भाजपाच्या राजवटीतील महागाईने सामान्य जनता होरपळून गेली आहे, भाजपची नोटाबंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याचा कट आहे, पहले मंदिर फिर सरकार, गुजरात मॉडेल म्हणजे प्रसिध्दीचा स्टंट असल्याची टीका करीत भाजपच्या गुजरातमधील काठावरील विजयावर, चार राज्यांतील पराभवावर तुटून पडत युवा नेता हार्दिक पटेलचे कौतुक करणारी शिवसेना कशी बदलली? उध्दवजीनी दिलेल्या ‘स्वबळा’च्या नाºयाचे काय झाले? शिवसेनेने गेल्या चार वर्षात मोदी सरकार व भाजपाविरोधी घेतलेली भूमिका विसरली काय? का हा केवळ पब्लिसिटी स्टंट होता? असे सवाल जयंत पाटील यांंनी ट्विटद्वारे केले आहेत.

शिवसेना भूमिका विसरली का?
जयंत पाटील यांनी या माध्यमातून शिवसेना आणि भाजपमधील गत चार वर्षातील टोकाच्या संघर्षाचा धागा पकडून शरसंधान साधले. उद्धव ठाकरे यांंनी स्वबळाची भाषा करूनही भाजपसोबत युती केली. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने युतीचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यांनी लोकहितापेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे त्यांची सत्तेसाठीची इच्छा दडून राहिली नाही. गेल्या चार वर्षात शिवसेनेने मोदी सरकार व भाजपविरोधी घेतलेली भूमिका विसरली का? असा सवाल पाटील यांंनी टष्ट्वीटद्वारे केला आहे.

Web Title: BJP's alliance with Shiv Sena's power except for publicity - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.