शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

Sangli: विटा नगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार, गोपीचंद पडळकर यांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:20 IST

विट्यात पदाधिकारी संवाद मेळावा

विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार असून, विटा नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकविणार आहे, असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.विटा येथे भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पडळकर म्हणाले, खानापूर तालुक्यात लोक गुलामगिरीच्या जोखडात आहेत. त्यांना मुक्त करायचं आहे. खानापूर पंचायत समितीत १८ ते २० वर्षे झाले, तेच ते अधिकारी तळ ठोकून आहेत. ते जनतेची नव्हे, तर नेत्यांची कामे करतात. अशांना वठणीवर आणलं पाहिजे.

विकासकामांचे श्रेय कुणीही घ्या, पण काम झालं पाहिजे. २०२९ ची निवडणूक अजून लांब आहे. तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालून जाणार आहे. त्यातून काहीजण अख्खे वाहून जातील. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला एकट्याला निवडणूक लढवायची आहे. आपल्याला सगळीकडे उमेदवार चांगले आहेत. जुन्या आणि नव्या लोकांनी एकत्र येऊन काम करा, असे आवाहन त्यांनी केले.माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात चांगले काम करणारी भाजपची टीम आहे. एकमेकांचे पाय ओढणारी टीम नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विटा नगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढवायची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन केले.वैभव पाटील यांना टोलाविटा पालिका भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आणि जिंकणार आहे. आतापर्यंत भाजप घेऊन तुम्ही इकडे तिकडे पळवायचा. पण ते आता चालणार नाही, असा टोला नव्याने भाजपत प्रवेश केलेल्या माजी आमदार पाटील गटाचे नेते वैभव पाटील यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला.