शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

कृष्णा नदीच्या प्रदूषणास जयंत पाटील जबाबदार, भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांची टीका

By अशोक डोंबाळे | Updated: March 21, 2023 19:33 IST

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे चार प्रकल्प, हुतात्मा, कृष्णासह ९ कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी, आष्टा, इस्लामपूर नगरपालिका आणि २९ गावांच्या ...

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे चार प्रकल्प, हुतात्मा, कृष्णासह ९ कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी, आष्टा, इस्लामपूर नगरपालिका आणि २९ गावांच्या सांडपाण्यामुळे कृष्णा नदीचे पाणी दूषित झाल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रदूषणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काहीच बोलत नाहीत; परंतु सांगलीच्या स्वप्नपूर्तीच्या प्रदूषणाचा वाद विधानसभेत मांडून स्व. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील वाद उखरून काढला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.पृथ्वीराज पवार म्हणाले, हरित न्यायाधिकरणाच्या समितीचा अहवाल आम्ही जयंत पाटील यांना मुंबईत पोहोच करतो. त्यांनी हिंमत असेल तर तो जसाच्या तसा विधानसभेत वाचून दाखवावा. कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणात माजी खासदार राजू शेट्टी हरित न्यायाधिकरणात गेले आहेत. स्वतंत्र भारत पक्षाच्या सुनील फराटे यांचीही याचिका दाखल आहे. रस्त्यावर, न्यायालयात लढा देऊन कृष्णा प्रदूषण मुक्तीचा सांगलीकरांचा ताकदीने प्रयत्न सुरू आहे. आम्ही या लढ्यात कुठल्या पक्षाचे, व्यक्तिगत वादाचे नावही घेत नाही. ही कृष्णाकाठच्या माणसांची लढाई आहे. जयंत पाटील यांनी मात्र प्रदूषणाचा मुद्दा राजकीय केला. हरकत नाही; पण तुमचे का झाकून ठेवताय, नदी प्रदूषणाला सर्वाधिक जबाबदार त्यांच्याच संस्था आहेत, असे प्रदूषण विभागाचा अहवाल सांगतोय. त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. सुधारणा न करता त्यांनी पुन्हा-पुन्हा नदी प्रदूषित केली आहे. राजारामबापू दूध संघ, राजारामबापू कारखाना, राजारामबापू डिस्टलरी, राजारामबापू कंट्री अँड फॉरेन लिकर या संस्था आणि आष्टा, इस्लामपूर पालिकांचे पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.

याशिवाय, हुतात्मा साखर कारखाना, हुतात्मा डिस्टलरी, कृष्णा कारखाना आणि डिस्टलरी यांचेही नाव अहवालात आहे. वसंतदादा आणि स्वप्नपूर्तीच्या बरोबरीने या दोषींवर कारवाईसाठी जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलण्याची गरज आहे.

शनिवारी मानवी साखळीकृष्णा नदीच्या प्रश्नावर जनतेमध्ये जनजागृती करण्यासह प्रदूषण करणाऱ्या साखर कारखान्यांचा निषेध करण्यासाठी शनिवार, दि. २५ मार्च रोजी सांगलीत कृष्णा घाटावर मानवी साखळी करण्यात येणार आहे. यातूनही शासनास जाग आली नाही तर मुंबईत आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही पृथ्वीराज पवार यांनी सांगितले.

जिल्हा बँक पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करापृथ्वीराज पवार म्हणाले, स्वप्नपूर्ती शुगर्सने डिस्टिलरी चालवल्याचे प्रकरण तेवढेच गंभीर आहे. जिल्हा बँकेच्या ताब्यात वसंतदादा कारखान्याची डिस्टिलरी होती आणि स्वप्नपूर्तीने परस्पर ती चालवली आणि बँक अधिकारी, पदाधिकाऱ्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही, हे पटणारे नाही. त्यासाठी विविध परवाने, वीज कनेक्शन, पाणी कनेक्शन घेतले गेले. त्याचे पैसे कुठे गेले, हे आज तुम्ही विचारत आहात. जर ही डिस्टिलरी जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे तर त्या पैशांना, त्या माध्यमातून झालेल्या कृष्णा प्रदूषणाला जिल्हा बँकेचे अधिकारी आणि पदाधिकारी तेवढेच जबाबदार आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

वर्षानुवर्षे मासे मेले, जयंतराव आज बोललेपृथ्वीराज पवार म्हणाले, दि. २१ जुलै २०२२ ला मसुचीवाडी, १३ जुलै २०२२ ला नागठाणे ते भिलवडी, ३ फेब्रुवारी २०२१ ला बहे बेट, १५ जुलै २०१९ ला पलूस व सांगली, ३० मार्च २०१५ ला तुपारी बंधारा, वारणा नदीत १७ जानेवारी २०२१ ला दूधगाव, १४ जुलै २०२१ ला मिरज कृष्णा घाट येथे मासे मेले, मगर मेली. त्यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभेत चर्चा किंवा लक्षवेधी का मांडली नाही?, त्यांनी कृष्णा नदी प्रदूषणावर व्यापक भूमिका मांडून प्रदूषण मुक्तीसाठी सरकारने योजना हाती घेण्याची मागणी केली असती तर आम्ही त्याचे स्वागत केले असते.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषणJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा